कंधार : मिर्झा जमिर बेग
कंधार तालुक्यात मागील चार ते पाच दिवसांपासून कंधार तालुक्यात संततधार पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक असलेले मूग पिकाला जाग्यावरच मोड फुटले आहेत त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या नेहमीच नशिबाला संकट दिवसेंदिवस येतं आहे.
यावर्षी मुगाचे पीक जोमात असताना शेतकरी आनंदात होता पण सध्या चार ते पाच दिवसापासून कंधार तालुक्यात संततधार पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास मुग या पिकाला शेतामध्येच मोड फुटल्याने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा निसर्गाने निराशा केली आहे. यंदा पाऊस समाधानकारक झाला पण
त्या सततधार पावसामुळे मुग पिकाच्या शेंगा तोडणीला आल्या परंतु कंधार तालुक्यातील व परिसरात मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार रिमझिम पावसाने मूग उडीद पिकाच्या शेंगांना प्रत्यक्षात मोड फुटले आहेत त्यामुळे शेतकरी कमालीचा अडचणीत सापडला आहे .
तरी कंधार तालुक्यातील उभ्या मुगाला मोड फुटलेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी साहेब यांनी द्यावेत व शेतकऱ्यांना मुग पिकाची पहाणे करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी आशा मागणीचे निवेदन मराठा महासंग्राम संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यांदा कंधार व परिसरातील मंडळांमध्ये शेतकऱ्यांनी मुग पिकाची पेरणी कंधार महसूल मंडळात २३० हेक्टर कुरुळा २३२ फुलवळ २३३ पेटवडज ३१६ उस्मानगर ३१० डिग्रस ३४२ व बारूळ महसूल मंडळातील २१३ हेक्टरवरील मूग पिकाची पेरणी केली होती पण यांदा निसर्गचक्रात अडकला आहे व संततधार पावसामुळे वरील मुगाचे अतोनात नुकसान झाले आहे .
त्या नुकसानग्रस्त मूग पिकाचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी साहेब यांनी तहसीलदार व तलाठी यांना देऊन मूक उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट दाहा हजाराची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना मराठवाडा अध्यक्ष प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख नांदेड ओम पाटील शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे व दिलेल्या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.