अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन ६ अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यांतर्गत धावणारी बस आता जिल्ह्याच्या बाहेरही धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असणार आहे.
अनेक दिवस वाहतूक बंद असली तरीही तिकिट दरांमध्ये काहीही बदल होणार नाहीत. एसटी सेवा सुरु होणार असल्याने एका जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांना, लोकांना जिल्हा बदलून प्रवास करता येणार आहे. अर्थातच बस प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अनिवार्य असेल हे निश्चित. विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही परवानगीची अथवा ई-पासची आवश्यकता नसेल पण खाजगी वाहतुकीला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. गणेशोत्सवासाठी १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांना करोना चाचणी बंधनकारक केल्याने एसटीला प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता.
आरक्षण करुनही अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. हा मुद्दा आता या निर्णयात दिसून येत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. हा निर्णय आजपासून अंमलात येत आहे. http://yugsakshilive.in/?p=1669
लॉकडाऊन उठविल्यानंतर राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू केल्या होत्या, मात्र सार्वजनिक वाहतूक सुरू न केल्याने त्याविरोधात गेल्याच आठवड्यात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलन केले होते. कोरोनामुळे २२ मार्चपासून एसटी बससेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडाल्याने कर्मचाऱ्यांचे पगार देणेदेखील अशक्य झाले होते. राज्य सरकारने ५०० कोटींचे कर्ज काढून एसटी महामंडळाला पगारासाठी पैसे दिले.
राज्यात११३ दिवस एसटी बससेवा बंद राहिली, त्यामुळे एसटी महामंडळाला २४०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले होते. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एस.टी.महामंडळाची बस सेवा गेल्या पाच महिन्यापासून बंद केली होती. या काळात महामंडळाला उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने मोठ्या अर्थिक फटका बसला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार काहीकाळ रखडले होते. आंतरजिल्हा प्रवासी वाहतुक बंद केल्याने इच्छुक प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती.http://yugsakshilive.in/?p=1684
प्रवाशांची गैरसोय आणि काही प्रमाणात आटोक्यात आलेल्या कोरोना संसर्गामुळे राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीस परवानगी दिली. मुंबई विभागात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीच एसटी बस सुरू करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी जिल्हातंर्गत बससेवा सुरू करण्यात आली होती.
कोरोनामुळे एसटीची आर्थिक चाके गाळात रुतली होती. लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील लोकांना महाराष्ट्रात आणण्याचे काम एसटी महामंडळाने केले. राजस्थान मधील कोटा येथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनादेखील एसटीने आणले. कोल्हापूर सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्याचे काम एसटीने केले. दररोज १३०० फेऱ्यांतून अंदाजे दीड लाख प्रवाशांना एसटीने सुविधा पुरविली. पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अगोदरच तोट्यात चालले होते.
अशातच आता कोरोनामुळे ५५ ऐवजी २२ प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत होती. यात महामंडळाचा खर्च वसूूल होणे कठीण होऊन बसले आहे. अशा स्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे आव्हान महामंडळासमारे उभे ठाकले होते. तथापि, प्रवाशांकडून जिल्ह्याबाहेर वाहतूृक सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात होती.
त्यानुसार आजपासून एसटी बस जिल्ह्याबाहेर धावणार आहेत. लॉकडाऊन कालावधीत एसटी महामंडळाला मोठ्या आर्थिक नुकसानाचा फटका सहन करावा लागला. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हांतर्गत एसटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. बसच्या क्षमतेपेक्षा अर्धे प्रवासी घेवून वाहतूक करावी लागत आहे.
अशातच प्रवाशांचा प्रतिसादही खूपच कमी आहे. सोबतच बस स्थानकाहून सुटलेल्या बस मार्गस्थ कुठेही थांबत नसल्याने कमी प्रवासी घेऊन धावत असलेल्या एसटींकडून महामंडळासाठी खर्च जास्त अन् उत्पन्न कमी मिळत आहे. अशातच आता प्रवाशांच्या मागणीची दखल घेत शासनाने आता जिल्ह्याबाहेर बसफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात येथील मध्यवर्ती बसस्थानकासह अन्य आगारामधून जिल्ह्याबाहेर लालपरी धावणार आहे.
आजपासून सुरू होत असलेल्या या सेवेचे यश आर्थिक आराखड्यांवर अवलंबून आहे. पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू असताना ‘एसटी’ला किलोमीटरमागे दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. आता कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. खर्च निघनेही कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याचे एसटीपुढे मोठे आव्हान असणार आहे.http://yugsakshilive.in/?p=1669
टाळेबंदीत एसटीची अत्यावश्यक सेवेशिवाय राज्यातील वाहतूक पूर्णपणे बंदच होती. तालुका ते गाव ते तालुका आणि जिल्हा अशी सेवा सुरू झाल्यानंतरही त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महामंडळाचे आतापर्यंत २,५०० कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्नही बुडाले आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे धाव घेतली होती. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला २९० कोटी रुपये येतो. महामंडळाने केलेल्या मागणीनंतर शासनाकडून ५५० कोटी रुपये आर्थिक मदत मिळवली. यामधून महामंडळाने कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे राहिलेले २५ टक्के वेतन, मे महिन्याचे ५० टक्के वेतन आणि जून महिन्याचे संपूर्ण वेतन अदा केले.
शासनाकडून मिळालेली मदत जवळपास संपलीच असल्याने आणि एसटीचे प्रवासी उत्पन्नही नसल्याने आता जुलै महिन्याचे वेतन देण्याचा प्रश्न महामंडळासमोर उभा ठाकला होता. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीच्या एक लाख कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागणार आहे. एसटीच्या तिजोरीत खडखडाट असल्याने जुलै महिन्याचे वेतन मिळण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. वेतनासाठी लागणारा खर्च राज्य शासनाकडून मिळावा यासाठी एसटी महामंडळ पुन्हा प्रस्ताव तयार करत असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतरच वेतन होणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले होते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे १८ हजार ५०० बसेस आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या सर्व बसेस पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करीत होत्या. एक किलोमीटरमागे ३० ते ३५ रुपये आवक, असे एसटीच्या उत्पन्नाचे ढोबळमानाने सूत्र आहे. मात्र विविध कारणांमुळे उत्पन्नाच्या या आकड्यापर्यंतही एसटी पोहोचू शकत नव्हती. २२ ते २३ रुपये उत्पन्न येत होते. परिणामी मागील काही वर्षात एसटीचा तोटा वाढत गेला आहे.पूर्ण लॉकडाऊन काळात एसटीला दररोज २२ कोटी रुपयांचा फटका बसत होता.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गंत वाहतूक सुरू करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. एवढेही प्रवासी मिळविणेही एसटीला कठीण होऊन बसले होते. बसस्थानकात मिळतील तेवढे प्रवासी घेऊन एसटी मार्गस्थ होत होत्या. मार्गात कुठेही थांबायचे नसल्याने थेट प्रवासी घेऊन बस निघत होती. आताही तीच परिस्थिती आहे.
अनेक बसस्थानकातून जातांना एसटीला काळजी घ्यावी लागणार आहे. अर्धेच प्रवासी घेऊन एसटीला निघावे लागणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना निम्मे प्रवासीही मिळाले नाहीत तर खर्च अधिक आणि उत्पन्न कमीच मिळणार आहे. परंतु पुर्णतः बंदच ठेवण्यापेक्षा परिस्थितीनुसार पुढे काही लाभदायक निर्णय होतील अशी आशा आहे. सद्यातरी आमदन्नी आठन्नी आणि खर्चा रुपय्या अशी एसटीची अवस्था झाली आहे.
आता आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्यानंतर सव्वाशे ते दीडशे किलोमीटरपर्यंत एसटीचा प्रवास होणार आहे. शंभर किलोमीटरमागे तीन हजार ५०० रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. निम्मे २२ प्रवाशाचे तिकीट भाडे १२५ रुपये झाल्यास दोन हजार ७५० रुपये एवढेच उत्पन्न येते. शंभर किलोमीटर मागे ७५० रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. जाण्या – येण्याच्या एका फेरीमागे १५०० रुपयांचा दणका एसटीला बसतो. आज २२ प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. आंतरजिल्हा प्रवासी मिळण्यासाठी एसटीच्या नाकीनऊ येणार आहे. त्यामुळेच या वाहतुकीचे मोठे आव्हान एसटीपुढे आहे. http://yugsakshilive.in/?p=1684
आंतरजिल्हा वाहतूक सुरू करणे आवश्यकच आहे. मात्र एसटीचे नुकसान होणार नाही, ही बाबही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. जिल्हा बाहेर वाहतूक सुरू करताना प्रवासी आणि कर्मचारी यांची सुरक्षा सांभाळणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे २२ प्रवासी वाहतूक करावी लागणार आहे. हे महामंडळ जनतेचे आणि सरकारचे आहे. तेव्हा एसटीचा वाढता तोटा लक्षात घेता संपूर्ण भाड्याचा आकार सरकारने एसटीला वेळेवर देणे आवश्यक आहे, http://yugsakshilive.in/?p=1669
कोरोनाचा फटका बसल्यामुळे गेल्या चार महिन्यात ६० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने आता टायर रिमोल्डींग क्षेत्रातही पदार्पण केले असून अमरावती येथील प्लॅन्ट मधून वाहनांचे टायर रिमोल्डींग करून मिळणार आहे. कोरोनाचा फटका बसल्यामुळे एसटी महामंडळ नवनवीन उत्पन्नाचे स्त्रोत शोधून एसटी आता आत्मनिर्भर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
खुल्या पद्धतीने आता एसटी टायर रिमोल्डींग व्यवसाय आणि मालवाहतुकीच्या व्यवसायत उतरत आहे. त्यामुळे खासगी वाहनांसह, मोठी वाहने, शासकीय वाहनांचेही टायर रिमोल्डींग महामंडळ करणार आहे. मात्र प्रत्यक्षात काय प्रतिसाद मिळतो यावर पुढील भूमिका ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने कोरोना संकटाच्या काळात कात टाकून प्रवाशी वाहतुकीसोबतच नवे उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने म्हणून एसटी महामंडळ वर्षभरात महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या राज्यभरातील तीस मोकळ्या जागेत खासगी वाहनचालकांसाठी पेट्रोल, डिझेल आणि एल.एन.जी. पंप सुरू करणार आहे. एसटी महामंडळाच्या संचालनाखाली इंडियन आॅईल कंपनीच्या सहकार्याने हे पंप बांधले जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या प्रवासी तिकिटांवरुन मिळणाऱ्या हजारो कोटींच्या उत्पन्नाला कोरोनामुळे मुकावे लागले होते.http://yugsakshilive.in/?p=1669
अशा परिस्थितीत मालवाहतुकीसाठीही एसटी प्रयत्नशील आहे. आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्यास सुरुवात झाली आहे. ते वाढविण्याचेही प्रयत्न होतील ही चांगली बाब आहे. चांगला प्रतिसाद मिळाला तर बुलढाणा विभागाप्रमाणे इतर विभागातही अनेक आर्थिक सुधारणावादी उपक्रम राबविण्यात येतील यात शंका नाही.
गंगाधर ढवळे ,नांदेड