स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचा कबड्डी (मुलीचा) संघ जाहीर

नांदेड:- नांदेड येथे होणाऱ्या पाश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलीच्या कबड्डी स्पर्धेसाठी यजमान विद्यापीठाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

या संघात सानिका पाटील, अरुणा दिवसे, सायली पाटील, मेघा चोरमारे,अरुणा पवार, अनुराधा जाधव, ऊजमा पठाण, प्रियांका सोनवणे ,निकिता हते, प्रांजळ मस्के, नेहा पवार या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षक प्राध्यापक डॉ. देवकते,अयुब पठाण यांनी संघाची निवड केली आहे.

महिला संघ निवडीचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र. कुलगुरू डॉ. बिसेन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. दिपक बच्चेवार, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. वि.आर. परिहार, प्रोफेसर डॉ. गंगाधर तोगरे, प्राचार्य डॉ. बी. डि. लाड., संपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *