सिडको येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन संपन्न….


सिडको,नांदेड :


महाराष्ट्र शासनाच्या आघाडी सरकारच्या वतीने गरीब आणि गरजू जनतेसाठी शिवभोजन थाळी चे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून ढवळे कॉर्नर,उस्माननगर रोड,सिडको नांदेड येथे क्रांतिवीर लहुजी साळवे सेवाभावी संस्था हाळदा संचलित शिवभोजन केंद्राचे उद्घाटन रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी कंधार लोहा मतदार संघाच्या लोकप्रिय समाजसेविका सौ आशाताई शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


या उद्घाटन कार्यक्रमाला दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर उद्योजक माधव डोम्पले,नांदेड तालुका शिवसेना प्रमुख व्यंकोबा येडे पाटील, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांना उत्कृष्ट असे भोजन देऊन क्रांतिवीर लहुजी साळवे सेवाभावी संस्थेने एक चांगला उपक्रम राबवावा असे आवाहन सौ. आशाताई शिंदे यांनी केले. आघाडी शासनाच्या काळातील हा अत्यंत महत्वाचा आणि गरजू जनतेसाठीचा उपक्रम सर्व संस्थांनी नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याचे आवाहन आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी केले. तर आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी या शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून त्याचा फायदा गरजू जनतेनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार बालाजीराव कल्याणकर,सौ समाजसेविका आशाताई शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवभोजन केंद्राचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. क्रांतिवीर लहुजी साळवे सेवाभावी संस्था हाळदा चे अध्यक्ष आनंदा कांबळे आणि संतोष तेलंग यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ शशिकांत हटकर, नितीन पाटील, बशीर शेख,डॉ. सुभाषराव वाघमारे,युवक काँग्रेसचे साईनाथ बसवंते, दीपक रेडे,बाळासाहेब टिकेकर,माणिक कांबळे, देविदास सूर्यवंशी, माधवराव राजकौर, वैजनाथ माने, प्रा. सुनील नामपल्ले, सुरेश भाग्यवंत,सुरेश जळपतराव आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *