नांदेड
नांदेड येथील सिडको परिसरात राहणारे कुटुंब कार क्रमांक (एमएच०२७ ३४) हे लोहाकडे येत होते. यावेळी लोहा कडून (एमएच २२ – 63 33) क्रमांकाची क्रुझर कार हे पालमकडे जात होती.
ही दोन्ही वाहने पेठशिवणीजवळ समोरासमोर एकमेकांवर अत्यंत जोरदारपणे धडकली. यात कारमधील तीन जण जागीच ठार झाल्याची माहिती दि.२६ डिसेंबर रोजी पोलिसांनी दिली.