नांदेड:-नुकतेच हदगाव येथे शूटिंग संपन्न झालेल्या “त्यागमूर्ती” या बिग मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो हदगाव येथे संपन्न झाला.
या वेळी परिसरातील आमदार मा नागेश पाटील आष्टीकर,प्रभाकरराव देशमुख, संस्था न चे महंत गोपालगिर, मा वानोळे साहेब,अरुण पाटील सर आणि सर्व भाविक दत्त जन्म सोहळ्यास उपस्थित होते.
सायंकाळी 6 वाजता चित्रपट “त्यागमूर्ती” दाखवण्यात आले. यावेळी नांदेड येथील चित्रपट कलाकार तथा कवी पांडूरंग कोकुलवार,निर्माता कलाकार साहेबराव इंगोले, चित्रपटाचे दिग्दर्शक रवी खिलारे, बालाजी चिलवेरी,गोविंद कल्याणकर,छ्याया -साजिद खान,सागर शिंदे,रतन कराड,सर्जेरावजोशी, ओमप्रकाश मस्के, श्रीकृष्ण साठे, गणपत पाटील,रोहन कोल्हे,शंकर चव्हाण, सी.डी.सूर्यवंशी,श्रुती इंगोले,ज्योती साळुंके सरला इंगळे,ऐश्वर्या काळे,रश्मी थुल,आदी अनेक कलाकारांच्या उपस्थित प्रेक्षकांनी,यात्रेकरूनी त्यागमूर्ती चित्रपट पाहिला.
छ्याया- समीर करे पाटीलमेकअप-दत्ताजी मुंबई,,संगीत-सुधाकर बनसोड,गीत-पंढरी सूर्यवंशी,असून संवाद महालिंग कंठाळे यांचे आहे.
नांदेड,हदगाव, दिघी,हरडफ आणि इतर अनेक ठिकाणी चित्रीकरण केले असून नांदेड जिल्ह्यातील अनेक नवोदित चित्रपट कलाकारांना यात संधी देण्यात आलेली आहे.असे मत आमदार नागेश पाटील यांनी व्यक्त करून उपस्थित कलाकारांचे स्वागत केले.
ययाती फिल्म प्रोड्युशन पुसद निर्मित “त्यागमूर्ती ” चित्रपट हा दत्तबर्डी संस्थान,हदगाव येथे चित्रित केला असून जवळपास दोन तासांचा आहे. एक जीवन कथा ही दिलेली आहे.
परिसरातील सर्व भाविकांनी हा चित्रपट अवश्य एकदा तरी पहावा असे आवाहन निर्माता साहेबराव इंगोले हदगाव यांनी केले.