कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्याकडून फुलवळ ग्रा.पं.पाणीपुरवठ्यासाठी तीन लक्ष रुपयांचा निधी

फुलवळकरांचा पिण्याच्या पाण्याचा मिटला प्रश्न

कंधार (प्रतिनिधी)


कंधार तालुक्यातील फुलवळ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी यापूर्वी या भागात शासनाने निधी दिला होता परंतु अजून पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली नाही. मात्र २०२१ साली आ.श्यामसुंदर शिंदे यांनी या गावांची पाणीपुरवठा योजनेला तीन लक्ष निधी दिल्याबद्दल फुलवळ ग्रामपंचायत चे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.पं.सदस्य बालाजी देवकांबळे यांनी विशेष लक्ष देऊन आ.श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून हि योजना आपल्या गावात आणली व फुलवळ येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला असल्याने त्यांचे गावकर्यांनी आभार मानले.


गावच्या कडेने मन्याडी नदी शेजारी असलेलं हे गाव,पाणीपुरवठ्याच्या योजना निधी असूनही पूर्ण न केल्यामुळे या गावांच्या आजूबाजूच्या वाडी तांड्याना उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.येणाऱ्या पुढील काळात पंतप्रधान किसान सन्मान योजना,विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना,अन्नसुरक्षा योजना,अंत्योदय आदी योजनेचा लाभ व फुलवळ सर्कलच्या सर्व कुटुंबानां केंद्र व राज्यशासनच्या योजना देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची माहिती ग्रा.पं.सदस्य बालाजी यांनी दिली.


रोकडेश्वरच्या कृपेमुळे फुलवळ येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आ.श्यामसुंदर शिंदे व सौ.अशाताई शिंदे यांच्या सहकार्याने दि २२ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा पाणीपुरवठ्यासाठी निधी असून यापूर्वी पंचवीस पंधरा चे शिशी रस्त्यासाठी नाली बांधकामासाठी फुलवळ ग्रा.पं.साठी २५ लक्ष रुपये दिले होते.

बोरवेल चे भूमिपूजन गावचे सरपंच प्रतिनिधी नागनाथ विठ्ठल मंगनाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नारायण मंगनाळे,माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा पं सदस्य बालाजी देवकांबळे,तुळशीदास रासवते,उपसरपंच ग्रा प फुलवळ परविन मंगनाळे,ग्रा.प.सदस्य शेख रहीम, मंगेश पांचाळ,तुकाराम तेलंग,नागेश गोधने,पत्रकार मधुकर डांगे,ग्रा.प.सदस्य प्रतिनिधी गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *