शेतीनिष्ठ शेतकरी, ऊस भुषण भगवानराव पाटील राजवाडीकर यांचे निधन

मुदखेड दि.३०

राजवाडी तालुका मुदखेड येथील शेतीनिष्ठ शेतकरी, ऊस भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगवानराव जयवंतराव पाटील राजवाडी कर यांचे आज वयाच्या ९१ व्या वर्षी मुदखेड येथील राहते घरी अल्प आजाराने आज दि. ३० रोजी १२:२५ वाजता निधन झाले आहे.

कै.भगवानराव पाटील राजवाडी कर यांचे पार्थिवावरती अंत्यसंस्कार उद्या दि.३१ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता राजवाडी तालुका मुदखेड येथे त्यांच्या शेतामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकाकडून देण्यात आली आहे.

सन २००७ मध्ये वसंतदादा शुगर इन्स्ट्युट चा ऊस भुषण पुरस्कार माजी मुख्यमंत्री  कै. विलासराव देशमुख, शरदचंद्र पवार यांचे हस्ते भगवानराव पाटील राजवाडी कर यांना देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले होते.

भगवानराव जयवंतराव पाटील राजवाडीकर यांच्या दुःखद निधनाने पंचक्रोशीत दुःखाचे वातावरण पसरले असून त्यांच्या पश्चात पत्नी, सुन, मुली व नाती असा मोठा परिवार आहे.

माजी वैद्यकीय अधिकारी डॉ . साहेबराव पाटील देवठाणकर, शेतीनिष्ठ शेतकरी बापूराव पाटील राजवाडीकर यांचे ते बंधू होते तर दिवंगत माजी सरपंच कै.सुभाष पाटील राजवाडीकर यांचे वडील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *