कंधार प्रतिनीधी
कंधार शहरातील नामांकितग्रो-एन-ग्लो पब्लिक स्कूल हे पंप हाऊस शेजारी आहे.या शाळेत जवळपास हजाराहुन अधिक विद्यार्थ्यां आहेत.रामरहिम नगर ते पंपहाऊस हा 500ते 600 मिटर कच्चा असल्याने विद्यार्थ्यांना व पालकाना ये-जा करण्यासाठी मोठी कसत करावी लागत आहे.त्यामुळे मुख्यधिकारी यांनी विद्यार्थी व पालकांच्या मागणीची दखल घेऊन हा सिंमेन्ट रस्ता करावा अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड व पालकांनी केली आहे.
ग्रो-एन-ग्लो पब्लिक स्कूल हे कंधार शहरातील दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित शाळा म्हणून संपूर्ण तालुक्यात ओळख आहे.या शाळेत शिक्षण घेण्यासाठी शहरासह तालुक्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हि शाळा मन्याड नदीच्या काठावर असल्याने रमेमय वातावरण आहे.परतु या शाळेला जाण्यासाठी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी रोज शेकडो पालक मोटारसायकल व चार चाकी वहान घेऊन येत असतात परंतु रस्ता कच्चा असल्याने यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
काळीची जमीन व थंड वातावरण असल्याने पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात या रस्त्यावर चिखल होत असतो.या चिखलामुळे अनेक पालकाच्या गाड्या स्लिप होऊन पडत असतात.तर पाई येणारे विद्यार्थी ही पडत असतात.उन्ह्यात या रस्त्यावर वहान जाऊन मोठ्या प्रमाणात धुळ होत असल्याने या धुळीचा परिणाम विद्यार्थ्यांनावर होत आहे.
या सर्व बाबीचा विचार करुन नगर पालीकेने रामरहिम नगर ते पंप हाऊस पर्यंत सिमेंट रस्ता करावा अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर —-यासह शंभर ते दिडशे पालकांच्या स्वाक्षरी आहेत.