खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते -प्राचार्य डॉ.शिवानंद अडकिने


मुखेड- संस्थेने व महाविद्यालयाने या खो-खोच्या स्पर्धा घेतल्या त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. खेळामुळे आपण एकत्र येतो.राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागते. खेळ जीवनात महत्त्वाचे आहेत.

आजाराचे प्रमाण कमी होते.सध्याची संस्कृती नागरी बनली असून मोबाईल वर जास्तीचा वेळ घालवत आहे. त्यामुळे शरीराकडे दुर्लक्ष होत आहे. आपणास सशक्त व निरोगी राहायचे असेल तर खेळ महत्त्वाचे आहे. आपण ग्रामीण भागातील मुलांनी खेळाकडे जास्त प्रमाणात वळावे. खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालय मुखेड येथील प्राचार्य डॉ. शिवानंद आडकिने यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता. मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ब विभाग आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा मुले/मुली उद्घाटन प्रसंगी बोलताना वसंतनगर ता.मुखेड येथे केले.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री एस.व्ही. मुंडे म्हणाले की शिक्षणाचे ध्येय हे व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. त्यासाठी पूरक म्हणून शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव शिक्षणात करण्यात आला आहे. विविध उपक्रमात क्रीडा स्पर्धा एक प्रकार आहे. खेळामुळे खिलाडूवृत्ती वाढीस लागते. जीवनात असंख्य असे खेळ खेळावे लागतात. ठाम निर्धार करून पुढे जा. खेळाडूंनी पंचावर विश्वास ठेवावा व पंचांनी ही निपक्षपातीपणे परीक्षण करावे.


अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की संस्था व महाविद्यालयाची इच्छा आहे की अशा खेळातून सांघिक भावना वाढीस लागावी.या कामी संस्थेच्या सर्व कार्यकारी मंडळाचे आम्हाला प्रोत्साहन असते. खो-खोच्या खेळामुळे आत्मसंरक्षण व व आक्रमण करण्याचे कौशल्य हस्तगत करता येते. शरीरयष्टी बळावते. खो-खोचा खेळ महाराष्ट्र,गुजरात, मध्य प्रदेशात जास्त प्रमाणात खेळला जातो. ही स्पर्धा या विभागाचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केली आहे.

आ. डॉ. तुषार राठोड यांनी या भागात गुणवंत विद्यार्थी सत्कार, सरपंच व ग्रामसेवक मेळावा, जनजागरण परिषद, तरुणांना नोकरी देणे या व यासारख्या अनेक गोष्टी केल्या. त्यांना आपणा सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
यावेळी प्रा. डॉ. दिलीप भडके देगलूर यांनीही समयोचित मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्तुत महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. सुभाष देठे यांनी करून स्पर्धा आयोजना पाठीमागची भुमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मराठी विभागाच्या प्रा. डॉ. सौ. कविता लोहाळे यांनी केले तर आभार माजी प्राचार्य डॉ. देवीदास केंद्रे व वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुभाष कनकुटे यांनी मानले.


समारोप प्रसंगी प्रा. डॉ नारायण जायभाये व प्रा डॉ. सतीश मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे यांनी करून खेळाडूंचे अभिनंदन केले व क्रीडा विभागाने या स्पर्धा आयोजन केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. महाविद्यालय खेळाकडे विशेष लक्ष सुरुवातीपासूनच देत आल्याचे त्यांनी सांगितले.


या स्पर्धेत मुलांमधून सर्वप्रथम येण्याचा बहुमान संजीवनी महाविद्यालय, चापोलीला प्राप्त झाला. तर द्वितीय क्रमांक उदयगिरी महाविद्यालय उदगीर व तृतीय क्रमांक ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड यांनी पटकावला. मुलींमधून ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड या टीमला प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.


कार्यक्रमास प्रा.व्ही.टी.कोरे मुखेड, संस्थेचे सदस्य मुख्या. गोविंद पवार, प्राचार्य दिलीप गायकवाड, उपमुख्याध्यापीका सौ. प्रेमला स्वामी, प्रा.मुंडे डी.आर.घोणसी, सिनेट सदस्य प्रा.डॉ.संजीव रेड्डी,प्रा. डॉ.तातेराव केंद्रे जळकोट,प्रा.डॉ.गोविंद कलवले,प्रा.डॉ. सौ. चंद्रकला हाणवंते कंधार,डी.एन. गायकवाड वसंतनगर,मुख्याध्यापक एम.डी. सूर्यवंशी सावरगाव, प्रा. डॉ. संजय गायकवाड मुखेड,श्री नवनाथ पोटफोडे राजुरा,आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्रा.बळीराम राठोड, पत्रकार दत्तात्रय कांबळे, पर्यवेक्षक सुभाष राठोड ,स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. व्यंकट चव्हाण,सह स्टाफ सेक्रेटरी प्रा.शिल्पा शेंडगे,प्रसिध्दी विभाग प्रमुख रामकृष्ण बदने,कार्यालय अधिक्षक रमेश गोकुळे हे मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. बाबाराव व प्रा .शंकरय्या कळ्ळीमठ, क्रीडा समितीतील सदस्य प्रा. डॉ. महेशकुमार पेंटेवार,प्रा.प्रदीप कोटुरवार,श्री रूपालाल रिंदकवाले महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *