डाॅ.प्रा भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी वऱ्हाडी मंडळींना तृप्त करुन अतिथी देवो भव ही म्हण ठरवली सार्थ…!

बहाद्दरपुरा

आपल्या देशात अतिथी देवतेला अन्यन्य साधारण महत्त्व आहे.म्हणुन दारी येणाऱ्या अतिथीस तृप्त करण्याची पध्दत सध्याच्या अधुनिक युगात तुरळक दिसते आहे.

दि.28/12/2021 रोज मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील वाई या गावातील लग्नाचे वऱ्हाड उदगीर येथून लग्न समारंभ पार पाडून त्यांच्या गावी परत जात असताना,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथे त्यांचे वाहन बिघडले.त्या विवाहाच्या मालकांना प्रश्न पडला.आता या अडचणीवर मात कशी करावी.असा प्रश्न पडलेला असतांनाच आजी मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या व डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे अन् सौ.चंद्रप्रभावतीबाई केशवराव धोंडगे या माता-पित्याच्या उदरी जन्मास आलेले व  मानवता धर्मास

 शिरसावंद्य मानून सामाजिक बांधिलकी जपणारा व्यक्तीमत्व म्हणजे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे साहेब यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी व-हाडी मंडळची भेट घेऊन जवळपास शंभर लोकांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करुन.लहान मुलांना पिण्यास  दूधाची व्यवस्था केली.दुसऱ्या दिवशी पण या सर्व लोकांची फराळ अन् जेवणाची व्यवस्था केली .

त्यांची गाडी दुरुस्त झाल्यावर त्यांना त्यांच्या सोबत “भाऊचा डब्बा” देऊन या सर्व मंडळींना पाठवणी करुन धोंडगे घराणे व बहाद्दरपुरी संस्कृतीचे दर्शन दिले.व-हाडी मंडळींनी ‘भाऊचा डब्बा’ या उपक्रमाचे कौतुक करत, आम्हाला जी भाऊंनी मदत केली ती आम्ही आयुष्य भर विसरणार नाही म्हणत आभार व्यक्त करत मानाची जयक्रांति केली..भाऊंच्या समाजपोयगी सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.

मानवता जपणाऱ्या युवानेतृत्व डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम भाऊस मानाचा मुजरा….व मानाची कोटी-कोटी जयक्रांति 

गोपाळसुत

दत्तात्रय एमेकर गुरुजी

रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *