फुलवळ (धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील मौजे बाचोटी येथील मन्याड खोऱ्याचा सुपुत्र बालाजी डुबुकवाड हे भारत मातेच्या रक्षणार्थ नुकतेच शहिद झाले असून त्यांच्या कुटुंबियांना जमेल तशी आणि शक्य असेल त्यांनी आर्थिक मदत करावी असे आवाहन फुलवळ येथील माजी व आजी सैनिकांनी केले असून काल ता. ३० डिसेंबर २०२१ रोजी फुलवळ येथून शाहिद बालाजी डुबुकवाड यांच्या अर्धांगिनी अर्चना बालाजी डुबुकवाड यांच्या बँक खात्यात काही रक्कम मदत म्हणून पाठवण्यात पण आली.
कंधार तालुक्यातील मन्याड खोऱ्याच्या कुशीत असलेल्या बाचोटी गावचे भूमिपुत्र बालाजी श्रीराम डुबुकवाड वय ३२ वर्ष हे भारतीय सीमा सुरक्षा दलात १४ वर्षांपूर्वी दाखल होऊन देश सेवा करत असताना ते जम्मू कश्मीर कुपवाडा येथे भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत असताना त्यांना वीर मरण पत्करावे लागले आहे.
बालाजी डुबुकवाड यांच्या अर्धांगिनी चे नाव अर्चना बालाजी डुबुकवाड असे असून त्यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत खाते असून त्यांचे खाते नंबर ६८०३६५८५३८० तर आय एफ एस सी कोड एम ए एच बी ००००१८४
( BANK OF MAHARASHTRA
ARCHANA BALAJI DUBUKWAD
AC.NO: 68036585380
IFSC CODE :MAHB 0000184 ) असा आहे , ज्यांना कोणाला मदत पाठवायची असेल त्यांनी सदर खाते नंबरवर रक्कम पाठवावी असे कळवण्यात आले आहे.
शहीद बालाजी डुबुकवाड यांच्या परिवाराला छोटीशी मदत म्हणून आज फुलवळ गावातील माजी सैनिक खंडेराव मंगनाळे, माजी सैनिक मारोतीराव मंगनाळे, माजी सैनिक पोचिराम वाघमारे, माधव बसवंते , गोविंदराव सूर्यवंशी, आजी सैनिक कपिल मंगनाळे, सर्व फौजी, विद्यमान सरपंच, सर्व आजी-माजी सदस्य, सर्व पत्रकार बांधव, गावातील सर्व लहान थोर मंडळी, गावकऱ्यांच्या वतीने शहीद निधीचा उपक्रम राबविण्यात आला आहे.