पंचायत समिती सदस्य उत्तमराव चव्हाण यांनी दिली उमरजच्या जिल्हा परीषद शाळेला भेट

कंधार ;


जि.प.प्रा.शा.उमरज येथे पंचायत समिती सदस्य उत्तमराव चव्हाण यांनी आज दि.४ जानेवारी रोजी अचानक सदिच्छा भेट दिली असता शाळेत स्वयंशासन दिन हा उपक्रम राबविला जात होता.

शाळेतील गुणवत्ता , शालेय उपक्रम, शालेय परिसर इत्यादी बाबी पाहुन समाधान व्यक्त केले.

या प्रसंगी त्यांच्या सोबत श्री सुंदरसिंह जाधव ( बंजारा क्रांतीदल प्रदेश उपाध्यक्ष ), श्री माधव कांबळे (ड्रायव्हर संघटना तालुका अध्यक्ष कंधार), श्री राजु सुर्यवंशी (सामाजिक कार्यकर्ते), तसेच मा श्री मंगनाळे साहेब केंद्रप्रमुख शेकापुर इ.उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *