गडगा (सा.वा.)
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गडगा येथे क्रांती ज्योती ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांची जयंती प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली.स्त्री-शिक्षणाची जाज्वल्य ज्योत अखंड तेवत ठेवत सावित्रीबाई फुले यांनी रुढी-पंरपरांच्या अंधारात चाचपडणार्या स्त्रीयांच्या सबलीकरणाचा मार्ग प्रकाशमान केला.
संपुर्ण जिवन हे सामाजिक उत्थानाचा वसा घेऊन शैक्षणिक आणि अस्पृश्यता निवारण कार्यासाठी समर्पित केले.देशाला नवी वाट दाखवणार्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपतालुकाप्रमुख नायगाव तथा पत्रकार शिवाजी पन्नासे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी इयत्ता सातवीतील दोन विद्यार्थ्यीनी कु.ज्ञानेश्वरी भाकरे,कु.प्रणिता कांबळे यांनीही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावर आधारित आपल्या भाषणात सविस्तर पणे विचार मांडले.कार्यकृमाचे प्रास्ताविक हानमंत चौधरी सर तर आभारप्रदर्शन बालाजी गिरेबोईनवाड सर यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक श्री बी.जी.गबाळे, वसंतराव फुलारी सर,एस.एम.गीरी सर, सहशिक्षिका सौ.सविता पुरी,सौ.गीता चौव्हान , अंगणवाडी सेविका सौ.शिवकांता टाले ( वारे) पद्ममीनबाई शिंदे उपस्थित होते.