नायगाव
बळेगाव जि.प. प्रा.शाळेतील उपक्रमशिल, आदर्श शिक्षक तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे प्रवक्ते पांडुरंग पाटील यांनी सामाजिक दायित्वाच्या ॠणाप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून त्यांचे वडील कै.खिरबाजी पाटील मारतळेकर यांच्या स्मृती दिनानिमित्य वडीलांचे सामाजिक चळवळीतील विचार आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर,अनावश्यक खर्च टाळून शाळेतील सर्व विद्यार्थाना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून समाजासमोर एक चांगला, अनुकरणीय संदेश दिलेला आहे.
शैक्षणिक साहित्यांचे वाटप गावचे सरपंच प्रतिनिधी व्यंकटी गायकवाड, उपसरपंच गंगाधर पाटील बेलकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धोंडीबा बेलकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदासराव बेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक टी.एम पगलवाड,सहशिक्षक पांडुरंग पाटील, डी.आर. पवार हे उपस्थित होते.
या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.