उदगीर तालुका पत्रकार संघाचे पत्रकारिता पुरस्कारात सुर्यप्रकाश धूत यांना जीवनगौरव पुरस्कार
उदगीर, (प्रतिनिधी)
——————–
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने अयोजित मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार २०२०-२०२१ चे पुरस्कार ५ जानेवारी रोजी जाहीर केले असून दैनिक सिध्देश्वर समाचारचे संपादक सुर्यप्रकाश धूत यांनी वृत्तपत्र क्षेत्रात आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्कार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले. तसेच शोध वार्ता तृतीय पुरस्कार
कंधार जि.नांदेड येथील दैनिक बहुरंगी वार्ताचे प्रतिनिधी राजेश्वर कांबळे यांच्या ‘कोरोना रुग्णासाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय जीवनदायी’ या बातमीस जाहीर झाला आहे.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने गत बारा वर्षापासून मराठवाडास्तरीय उत्कृष्ठ वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जात असून पुरस्काराचे हे तेरावे वर्ष आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात उत्कृष्ठ वार्ता गट- प्रथम पुरस्कार दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे खुलताबाद जि.औरंगाबाद येथील प्रतिनिधी विजय चौधरी यांच्या ‘शेतमाल उद्योगासाठी टाटांना साकडे’ या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,
व्दितीय पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे ढोकी जि.उस्मानाबादचे प्रतिनिधी सुरेश कदम यांना ‘ऊसाचे क्षेत्र वाढले, अतिरिक्त ऊस प्रश्न भेडसावणार’ या बातमीस अमोल निडवदे यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार कै.नागनाथअण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ तीन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, दैनिक दिव्य मराठीचे उमरगा प्रतिनिधी प्रदीप भोसले यांच्या ‘आपत्तीत संधी शोधत धरली प्रगतीची कास’ या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्या वतीने तीन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कार जळकोट जि.लातूर येथील दैनिक यशवंतचे प्रतिनिधी माधव होनराव यांच्या ‘संगीता दामरे यांच्या यशाला मेहनतीची किनार,नौकर राहून पत्नीला शिकवले, पत्नी बनली सरकारी कर्मचारी’ या बातमीस पत्रकार दयानंद बिरादार यांच्या वतीने कै.नागनाथ बिरादार यांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
शोध वार्ता गट- प्रथम पुरस्कार दैनिक लोकमतचे अंबाजोगाई जि.बीड येथील प्रतिनिधी अविनाश मुडेगावकर यांच्या ‘जिवावर उदार होऊन ४०० रु रोजाने करतात काम ‘ या बातमीस अर्जून मुद्दा यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय पुरस्कार दैनिक देशोन्नतीचे किनगाव ता.अहमदपूर जि.लातूर येथील प्रतिनीधी असलम शेख यांच्या ‘शासकीय विश्रामगृहाची इमारत मृत अवस्थेत’ या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्या वतीने रोख तीन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, सिल्लोड जि.औरंगाबाद येथील दैनिक पुढारीचे प्रतिनिधी राजू वैष्णव यांच्या ‘साठ गावानी कोरोनाला वेशीवर रोखले’ या बातमीस जेष्ठ संपादिका श्रीमती निर्मलाताई बांगे यांच्या वतीने कै.वसंतराव बांगे यांच्या स्मरणार्थ रोख तीन हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,
तर तृतीय पुरस्कार
कंधार जि.नांदेड येथील दैनिक बहुरंगी वार्ताचे प्रतिनिधी राजेश्वर कांबळे यांच्या ‘कोरोना रुग्णासाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय जीवनदायी’ या बातमीस पत्रकार प्रशांत अपसिंगेकर यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ रोख २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
परिक्षक म्हणून लातूर येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, राजर्षी शाहू महाविद्यालथयाचे प्रा.शिवशंकर पटवारी लातूर व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्रा.डाॅ. बाळासाहेब दहीफळे यांनी काम पाहिले. तर जेष्ठ पत्रकार अॅड.एल.पी.उगीले, व्ही.एस.कुलकर्णी, प्रा.प्रविण जाहूरे, डाॅ.धनाजी कुमठेकर या निवड समितीने जीवनगौरव पुरस्काराची निवड केली आहे. मान्यवरांच्या हस्ते लवकरच पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.