मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मुखेड: दर्पण दिनानिमित्त मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने, के. प्रा. शा. मुखेड व सावित्रीबाई फुले विद्यालय फुलेनगर येथील शालेय विद्यार्थ्यांना मास्क,पेन,वही व उजळणी चे पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्षअॅड. संदीप कामशेट्टे, सचिव मेहताब शेख, पत्रकार दादाराव आगलावे, सुशील पत्की, अॅड. आशिष कुलकर्णी, शेखर पाटील, शिवकांत माठपती, राजेश बंडे, संपादक ज्ञानेश्वर डोईजड, नामदेव श्रीमंगले, भास्कर पवार यासह एल.एस. राठोड, सौ. शीला उबाळे,सौ. श्रीदेवी जगताप,सौ. सुशीला गवते, सौ. करुना बोधने यांच्यासह पालक राजू रोडगे, तसेच सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. पाटील, वैजनाथ दमकोडवार,मुंडकर सह शिक्षक, शिक्षीका, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

के.प्रा. शाळेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.शिला उबाळे यांनी केले. कार्यक्रमाबद्दल गट शिक्षणाधिकारी व्यंकट माकणे, केंद्रप्रमुख मधुकर गायकवाड, मुख्याध्यापक दीनदयाल बनसोडे यांनी पत्रकार संघाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *