” मायेची ऊब ” मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या उपक्रमात नागरिकांना चादर वाटप तर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मास्क चे वाटप

दर्पण दिन फुलवळ तालुका कंधार येथे विविध सामाजिक उपक्रमाने साजरा


मुखेड/ प्रतिनिधी


कै बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दि 06 रोजी पत्रकार तथा दर्पण दिन गुरुवारी विविध सामाजिक उपक्रमाने मोठया उत्सहात साजरा करण्यात आला मुखेड तालुका मराठी पत्रकार संघ च्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना कडाक्याच्या थनाडीत मायेची ऊब देण्यासाठी उबदार ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले यासोबतच जीप केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मास्क चे वाटप करण्यात आले उपजिल्हा रुग्णल्यात सर्व पत्रकार ची संपूर्ण शारीरिक आरोग्य तपासणी करण्यात आली .


पौष महिन्याच्या सुरुवातीलाच चोर पाऊलानी अचानक वाढलेल्या कडाक्याच्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्याची आवश्यकता असते परंतु काही लोकांना ते ही योग्य वेळी मिळत नसल्याने कुडकूडणे ची वेळ येते समाजातील काही वंचित कष्टकरी , गरजू नागरिकांना जात धर्म भाष यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जोपासण्याच्या हेतूने मुखेड तालुका मराठी पत्रकार संघ च्या वतीने थंडी पासून बचाव व्हवा म्हणून आज पत्रकार दिन च्या निमित्ताने उबदार ब्लॅंकेट वाटप करून मायेची ऊब देण्यत आले समाजातील खऱ्याखुऱ्या गरजवंताला ब्लँकेट देण्यात आले आहे


तसेच यासोबत के. प्रा. शा. मुखेड येथील शालेय विद्यार्थ्यांना मास्क,पेन,वही व उजळणी चे पुस्तक शैक्षणिक साहित्य च वाटप पत्रकार संघ चे वतीने करण्यात आले.


उपजिल्हारुग्णल्यात वैद्यकीय संस्था आय एम ए च्या वतीने सर्व पत्रकार ची शारीरिक आरोग्य तपासणी करण्यात आली आहे यात रक्त चाचणी सोनोग्राफी ईसीजी बीपी नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, दंत रोग तपासणी करण्यक्त आ
लि

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ सुधकार तहाडे, मुखेड भूषण डॉ दिलीप पुंडे, डॉ वेंकट सुभेदार भोसले, डॉ अशोक कौरवार, डॉ.सतीश बच्चेवार, डॉ पांचाळ, डॉ रामराव श्रीरामे, डॉ पांडुरंग श्रीरामे डॉ राहुल मुककवर, डॉ अविनाश पाळेकर, डॉ धमणे, डॉ श्रीहरी बुडगेमवार, डॉ संदीप ढगे, तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम भालके उपस्थित होते
तहसील कार्यलय च्या वतीने तहसीलदार काशिनाथ पाटिल पोलीस स्टेशन मुखेड च्या वतीने पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, सपोनि केंदरे, फौजदार गजानन काळे, फौजदार कुंभारे, यांनी तर महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ अडकीने यांच्या वतीने शिवसेंना च्या वतीने तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे उपजिल्हा प्रमुख संजय बेलीकर, शहर प्रमुख शंकर चिंतमावड किसान सेने प्रमुख शंकर पाटील लुटे यांनी पत्रकार चा लेखणी देऊन सन्मान केला
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्षअॅड. संदीप कामशेट्टे, सचिव मेहताब शेख, पत्रकार दादाराव आगलावे, सुशील पत्की, अॅड. आशिष कुलकर्णी, शेखर पाटील, दत्तात्रय कांबळे ,शिवकांत माठपती, राजेश बंडे, जैनोद्दीन पटेल,
ज्ञानेश्वर डोईजड, नामदेव श्रीमंगले, भास्कर पवार रामदास पाटील शरद जोगदंड , विजय बनसोडे, संजय कांबळे, हाफिज खान पठाण, उपस्थित होते
यासह एल.एस. राठोड, सौ. शीला उबाळे,सौ. श्रीदेवी जगताप,सौ. सुशीला गवते, सौ. करुना बोधने यांच्यासह पालक राजू रोडगे, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.शिला उबाळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *