माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

नांदेड ; प्रतिनिधी

माजी सैनिक संतोष हांबर्डे व पठान आयुबखॉं यांचे गेल्या बऱ्याच वर्षापासून समस्या चे निवारण होत नव्हते म्हणून आज दि 10 जानेवारी सोमवारी माजी सैनिक संघटनेच्यावतीने नांदेड येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांची भेट घेऊन सैनिकांची समस्या मांडली.
अशी माहीती संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी कंधार येथे दिली

24 जानेवारी पर्यंत समस्यांचे निवारण नाही झाले तर जिल्हा अधिकारी कार्यालया समोर 25 जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याची माहीती यावेळी बालाजी चुकलवाड यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *