डॉ. सतीश बच्चेवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य
मुखेड: (दादाराव आगलावे )
येथील पहिले मुख व दंतरोग चिकित्सक तथा जिप्सी चे सदस्य डॉ. सतीश बच्चेवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिप्सी मॉर्निंग ग्रुप ने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात 136 रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रमी नोंद केली. यात 14 महिलांचा सहभाग आहे. रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपती डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज होते तर बारूळ मठसंस्थांचे गुरुवर्य नामदेव महाराज यांनी शिबिराचे उद्घाटन केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुखेड भूषण तथा डब्लू. एच. ओ. चे सदस्य डॉ. दिलीपराव पुंडे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधाकर तहाडे, मुख्याधिकारी महेश हांडे, प्रशिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अशोक कौरवार, गट शिक्षणाधिकारी व्यंकटराव माकणे, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल मुक्कावार, सचिव डॉ. पांडुरंग श्रीरामे, लोकमतचे उपसंपादक राजकुमार जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी धनवंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज पुढे म्हणाले की, मुखेड मध्ये रक्तदानाची चळवळ डॉ. दिलीपराव पुंडे साहेबांनी सुरुवात केली. या चळवळीचं खूप मोठं जाळं तालुकाभरच नव्हे तर जिल्हाभर पसरलेलं आहे. रक्ताची गरज फार आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये मुखेडकर रक्त देण्यासाठी सरसावतात. राज्यातील रक्तदान चळवळीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा मुखेडकरांचे नाव अग्रस्थानी असेल, जिप्सी मॉर्निंग ग्रुप च्या वतीने तिसरे यशस्वी रक्तदान असल्याचे महाराजांनी नमूद करत जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
4मुखेड भूषण डॉ.दिलीपराव पुंडे म्हणाले की, क्तदानाची चळवळ खर्या अर्थाने आता मुखडात रुजली आहे. रक्तदात्यांना रक्तदानाचे महत्त्व पटले असून ते स्वयंस्फूर्त रक्तदान करत आहेत. जिप्सी चे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे यांनी जिप्सी चे लावलेले रोपटे आता वटवृक्षात रुपांतरीत झालेले आहे. जिप्सीयन्सच्या हातून विविध समाजोपयोगी कार्य होत असल्याचे पाहून मनस्वी आनंद होत आहे.
गुरुवर्य नामदेव महाराज बारुळकर यांनीही आशीर्वाद पर भाषण करत जिप्सीयन्चेसचे अभिनंदन केले. यावेळी जिप्सी चे कार्याध्यक्ष बलभीम शेंडगे यांना, संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे यांनी जिप्सीभूषण पुरस्कार घोषित केला व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बलभीम शेंडगे यांचे अनेकांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यमान अध्यक्ष शेखर पाटील यांनी केले. डॉ. सतीश बच्चेवार व बलभीम शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले.जिप्सी चे सचिव बालाजी तलवारे यांनी परीचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सौ. मनीषा जोशी यांनी केले तर आभार प्रा.जय जोशी यांनी मानले. दरम्यानच्या काळात अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेटी देऊन जिप्सी चे तोंड भरून कौतुक केले.
शिबीर यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे, विद्यमान अध्यक्ष शेखर पाटील, सचिव बालाजी तलवारे, कार्याध्यक्ष बलभीम शेंडगे, कोषाध्यक्ष वैजनाथ दमकोंद्वार,प्रा.जय जोशी सर, वाढदिवस मूर्ती डॉ. सतीश बच्चेवार, आकाश पोतद्दार, उत्तम आम्रतवार, राजेश भागवतकर, गोविंद जाधव,
सागर चौधरी, उमाकांत डांगे, सुरेंद्र गादेकर, श्रीकांत घोगरे, गिरीश देशपांडे, हनुमंत गुंडावार, गजानन मेहकर, धनंजय मुखेडकर, किशोर चौहाण, चरणसिंह चौहाण, योगेश पाळेकर, अरुण पतेवार, भास्कर पवार, अनिल पेदेवाड, ईश्वर फुलवळकर, नामदेव श्रीमंगले, डॉ. स्वानंद मुखेडकर, सुरेश उत्तरवार, विठ्ठल बिडवेई, व्ही. एस. मोरे, गुपित कांबळे आदीसह अनेकांनी अथक परिश्रम घेतले.
हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व, सुखा-दुखात धावून जाणारे एक सामाजिक कार्यकर्ते बलभीम शेंडगे यांना संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे यांनी जिप्सीभूषण हा सन्मान घोषित केला व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आला.
बलभीम शेंडगे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.