अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )
माणसाच्या डोक्यात एकदा कविता शिरली की घरी – दारी, शेत शिवारी माणुसकीचे पिक अमाप येतं. असे प्रतिपादन गझलकार प्रा डॉ मुकुंद राजपंखे यांनी केले.
डॉ राजपंखे किनगाव येथील मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या खुल्या व्यासपीठावर आयोजित कवी शिवाजीराव नामपल्ले लिखित आधारवड या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानंतर नव – प्रकाशित कविता संग्रहावर भाष्य करतांना बोलत होते. हा कार्यक्रम दि ०३ जाने २२ रोजी पार पडला. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ पांडुरंगराव टोंपे होते.
सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार तथा सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई विलासराव सिंदगीकर यांच्या शुभहस्ते आधारवड या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. सचिव तथा प्राचार्या शोभाताई गुंठे आणि किनगावचे सरपंच किशोर बापू मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील ओजल अभिजात माळवे, सुप्रसिद्ध निवेदक आणि कवी राजेसाहेब कदम, बालाजी मुंडे, अनिल चवळे, राजेंद्र कांबळे, सुभाष साबळे, एन डी राठोड, अंकुश सिंदगीकर, संजीवकुमार भोसले, डॉ अश्विनी टोंपे, डॉ अभिजित माळवे,शिवाजी नामपल्ले, प्राचार्य तुकाराम हरगिले, कु श्रुती नामपल्ले आणि भगवान आमलापुरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ राजपंखे म्हणाले की साहित्य माणसाला अधिक संवेदनशील बनवतं. संवेदनशील माणूस जीवन आणि जग अधिक सुंदर करतो. हाच प्रयत्न शिवाजी नामपल्ले लिखित आधारवड या कविता संग्रहाच्या पानोपानी दिसून येतो.
प्रकाशन सोहळ्यानंतर निमंत्रीतांचे कविसंमेलन पार पडले. कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ मुकुंद राजपंखे होते. सुत्रसंचालन राजेसाहेब कदम यांनी केले. यात एकूण १३ कवींनी सहभाग घेतला.यात विलासराव सिंदगीकर, बालाजी मुंडे, अनिल चवळे, राजेंद्र कांबळे, सुभाष साबळे, एन डी राठोड, अंकुश सिंदगीकर, संजीवकुमार भोसले, कु श्रुती नामपल्ले, प्राचार्य तुकाराम हरगिले आणि भगवान आमलापुरे यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .दिपप्रज्ललणाने कार्यक्रमास सुरुवात झाली. डॉ पांडुरंग टोंपे, सरपंच किशोर बापू मुंडे आणि विलासराव सिंदगीकर यांनी मनोगत व्यक्त करुन नामपल्ले सरांना शुभेच्छा दिल्या.
प्रकाशन सोहळ्याचे नेटके प्रास्ताविक एम ई भिंगे सर यांनी केले.सुंदर आणि बहारदार सुत्रसंचालन आणि दोन्ही कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख नितीन कुंठे यांनी मानले.कविसंमेलनास विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.