मुख्याध्यापक ढवळे जी. एस यांची माहिती
नांदेड : जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांत शालेय तथा सहशालेय उपक्रमांतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. सद्या ओमिक्राॅन या कोरोना विषाणूच्या उच्छादामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. गत दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या जैविक दहशतवादास झुगारुन देत चिमुकल्यांनीच आनंदनगरी चे आयोजन केले होते. घाबरून जाण्यापेक्षा योग्य ती खबरदारी घेतली तर या रोगावर मात करता येते.
बालमहोत्सवानिमित्त जवळ्यात घेतलेल्या आनंदनगरी कार्यक्रमातून विविध दुकान साकारून, व्यवसाय कसा करावा ? रुपये कसे जमा करावे ? विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री कशी करावी ? याचे ज्ञान खरी कमाई म्हणजेच आनंदनगरी हा उपक्रम राबवितांना मुख्याध्यापक ढवळे जी. एस.व सहशिक्षक संतोष घटकार यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून व्यावसायिकतेचे धडे दिले.
कालपासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शाळा प्रत्यक्ष अध्यापनाकरिता बंद करण्यात आल्या आहेत. त्यापूर्वीच हा उपक्रम घेण्यात आला. या आनंद मेळाव्यात पाणीपुरी , गोळ्या बिस्किट, चना उसळ ,समोसा, केक, गुलाब जामुन, पोहे, बर्फी, पेरु, बोरं, वालाच्या शेंगा, चहा, पोहेचिवडा, मुरकुल, सोनपापडी, तिळलाडू, मुरमुरे लाडू, शाबुवडे, लाह्या मुरमुरे, चाॅकलेट्स, खिचडी, विविध प्रकारच्या खेळणी ,
विविध पुस्तकं वह्या पेन – पेन्सील, पाटी- खडू व विविध खाद्य पदार्थ घेवून विद्यार्थी व विद्यार्थिनी दीपक शिखरे वैभवी शिखरे, अक्षरा शिंदे ,अक्षरा शिखरे, मयुरी गोडबोले, श्रुती मठपती, योगेश मठपती, प्रिया टिमके, नंदनी टिमके, पल्लवी कदम, विक्रम गोडबोले, कोमल चक्रधर, श्रावस्ती गच्चे, शाश्वती गच्चे, नामदेव पांचाळ, अजिंक्य गोडबोले ,
पंचशील गच्चे, सुप्रिया गच्चे, लक्ष्मण शिखरे , कल्याणी शिखरे , कृष्णा शिखरे, पार्थ शिखरे, वैभवी शिखरे, महाजन तेलंगे, रितेश गवारे, अक्षरा गोडबोले, गितांजली गोडबोले, शादुल शेख, शाहेद शेख, साक्षी गोडबोले, सिद्धांत गोडबोले यांनी विविध व्यवसाय करून अनुभव घेतला.
या कार्यक्रमासाठी भंते धम्मपाल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सरपंच साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले किशन गोडबोले , समाधान लोखंडे , चंद्रकांत मठपती, प्रमोद मठपती , मिलिंद गोडबोले, आप्पाराव शिखरे, मारोती चक्रधर, पवन गोडबोले, ईश्वर गच्चे , वैभव गोडबोले, विनोद गच्चे , राजेश शिखरे,
मुख्याध्यापक ढवळे जी.एस., संतोष घटकार , पांडुरंग गच्चे, आकाशवाणी निवेदक तथा पत्रकार आनंद एसपी गोडबोले, हैदर शेख, संघरत्न गोडबोले, चंद्रकांत गोडबोले, गणेश मठपती, विकास गोडबोले यांच्यासह ग्राहक म्हणून गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध गायक विनोद गोडबोले यांच्या गीतगायनाचा कार्यक्रमही संपन्न झाला.
हा कार्यक्रम घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून चांगला व्यवसायिक म्हणून प्रथम नामदेव पांचाळ, द्वितीय कोमल चक्रधर आणि तृतीय अक्षरा गोडबोले यांची गावकऱ्यांनी निवड केली. तसेच वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिकवण देत असल्याबद्दल शाळेतील शिक्षकांचे कौतुकही केले.