उमरज येथे हवामान अनुकूल बदल प्रकल्पाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शामसुंदर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

कंधार ; प्रतिनिधी

उमरज तालुका कंधार येथे दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी नाबार्ड च्या हवामान बदल अनुकूल प्रकल्पाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शामसुंदर शिंदे व नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे यांच्या हस्ते व संस्कृती संवर्धन मंडळाचे संचालक रोहित देशमुख तसेच सरपंच प्रतिमाताई तोरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.


नाबार्डच्या हवामान बदल अनुकूल प्रकल्पामुळे निसर्गाच्या संभाव्य धोक्यांना सामोरे जाऊन शेतीमध्ये आमूलाग्र बदल करता येईल. गावकऱ्यांनी शासनाच्या कोणत्या योजना मग ते नाबार्डच्या असोत किंवा अन्य यंत्रणेमार्फत असो ते सक्षम पणे राबविले तरच यशस्वी होतात. प्रत्येक योजनेत स्वतःचा सहभाग दिला तरच त्यात शाश्वतता टिकून राहते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शामसुंदर शिंदे यांनी या प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.

तसेच त्यांनी कंधार तालुक्यातील दुष्काळ कायमचा संपावा व तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढावे यासाठी आमदार शामसुंदर शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात सिंचन तलावाची मंजुरी आणली असल्याचे सांगून उमरज अंतर्गत पळसवाडी येथे सिंचन तलाव मंजूर झाला असून येत्या एक दोन वर्षात हे काम पूर्ण होईल व यातून उमरज अंतर्गत येणाऱ्या सर्व वाडी तांड्याचा कायमस्वरूपी दुष्काळ संपून सिंचन क्षेत्रात वाढ होईल असे सांगितले.


सदर कार्यक्रम संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व संत नामदेव महाराज पाणलोट विकास समिती व ग्रामपंचायत उमरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी बोलतांना संस्कृती संवर्धन मंडळाचे संचालक रोहित देशमुख यांनी उमरज मध्ये पाणलोट विकास प्रकल्पानंतर शाश्वत विकास प्रकल्प ,शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व त्यानंतर हवामान बदल अनुकूल प्रकल्पाची मंजुरी आणण्यासाठी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राजेश धुर्वे यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


नाबार्डचा हवामान बदल अनुकूल प्रकल्प जिल्ह्यातील लाठ खुर्द व केदारवडगाव येथे प्रगतिपथावर असून ही दोन्ही गावे आज सक्षम झाली आहेत.लाठ खुर्द हे गाव शेडनेटचे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. बीज उत्पादनसाठी येथील 45 शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाली आहे.

अशाच पद्धतीने उमरज गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्गदर्शनातून आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करावे असे आवाहन राजेश धुर्वे यांनी केले.
गावातील नीट परीक्षेत 585 गुणांनी उत्तीर्ण झालेली कुमारी अश्विनी पांडुरंग तोरणे हिचा सत्कार सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत व्यंकटराव गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन निवृत्‍ती जोगपेटे तर आभार प्रदर्शन राजरत्न गायकवाड यांनी मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाबाराव जळबा भूत्ते यांनी भूषविले. या कार्यक्रमासाठी अश्विनीताई कापुरे,सुनिता ताई चव्हाण, गिरीश डिगोळे, ग्रामसेवक देवकते, भिमाबाई नागनाथ पदमल्ले, पातळगंगा, पानशेवडी, संगमवाडी, नागलगाव येथील सरपंच व कार्यकर्ते,संस्कृती संवर्धन मंडळाचे व्यवस्थापक सचिन येरमाळकर, राव सर,गंगाधर कानगुलवार, माधव ताटे, वसंत रावणगावकर, चंद्रकांत बाबळे,राहुल पगडे,किशोर काळे, भीमराव मुंढे,अविनाश जोगी, सचिन बाबळे सह सर्व प्रतिनिधी,सरपंच प्रतिनिधी परसराम तोरणे, माजी सभापती व्यंकटराव गायकवाड नागनाथ पदम्पल्ले,

ज्ञानेश्वर वाघमारे,शिवराम राठोड, नामदेव पवार, माधवराव गुट्टे,तुकाराम किरतवाड,मारुती तोटेवाड कोंडीबा किरतवाड,प्रकाश पवार,संभाजी गायकवाड, जनार्दन भुत्ते,शंकर भूत्ते,ऋषी तोरणे, जळबा भूत्ते,पांडुरंग तोरणे, काशिनाथ तोरणे, माधव वाघमारे, गणेश गडंबे,प्रकाश गायकवाड,

भाऊराव गडंबे,शेख शादुल, विनायक कटकमवार,राजू गंदलवाड, एकनाथ कांबळे मयूर कांबळे, चंदू गायकवाड, सिताराम तोरणे,किशन गंदलवाड, सूर्यभान भूत्ते,सूर्यकांत तोरणे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *