पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांचा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्याकडून सत्कार

प्रतिनिधी, कंधार

येथील लोकप्रिय पत्रकार राजेश्‍वर कांबळे यांना उदगीर तालुका पत्रकार संघाचा मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता पवार, राष्ट्रवादी किसान सभेचे उपाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास धर्मापुरीकर, जि.प.चे.माजी उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे, जि.प.सदस्य अॅड.विजय धोंडगे, संजय पाटील कराळे, शिवराज धोंडगे, शरद भागानगरे, भरत चिखलीकर, माधव मोरे, अनिल मोरे, मन्मंथ कल्याणकर, संतोष कागणे, सुरेश शिरसे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *