हिंगोली (प्रतिनिधी) : हिंगोली शहरातील बियाणी नगर भागात ३० डिसें. २०२१ रोजी चार वाजताच्या सुमारास एसबीआय शाखेमध्ये बँक मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या कल्याणकर यांच्या पत्नी घरामध्ये एकट्या असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात अनधिकृत प्रवेश करून पिस्तुलचा धाक दाखवून अविनाश यांची पत्नी अंजली यांना गंभीर दुखापत करून व त्यांचे हात-पाय बांधून चोरट्यांनी घरातील साहित्यासह रोख रकमेवर डल्ला मारला होता. अखेर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत फोन व चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
चोरट्यांकडून दोन गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही यातील एक आरोपी फरार असल्याची माहिती आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकला होता. दरोड्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अखेर याचा छडा लावत दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, उदय खंडेराया यांच्या पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने ही कारवाई केली