“डॉक्टरांची गोळ्या घालून हत्या ” केल्याच्या घटणेचा बहुजन भारत पार्टीच्या वतीने केला जाहीर निषेध

नांदेड

“बहुजन भारत पार्टीच्या वतीने जाहीर निषेध व गुन्हेगारांना तात्काळ आटक करून शिक्षा करण्यात यावी” दिनांक 11.01. 2022 रोजी यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड या ठिकाणी मागासवर्गीय वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्यावर सायंकाळी चार वाजता अज्ञात इसमाने हातात कायदा घेऊन गोळ्या घालून क्रूर हत्या करण्यात आली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे हनुमंत धर्मकारे हे बाल रोग तज्ञ प्रसिद्ध डॉक्टर उत्कृष्ट जनतेला सेवा द्यायचे. अशा जनतेची सेवा करणाऱ्या डॉक्टरची महाराष्ट्र मध्ये हत्या होत आहे ती पण दिवसा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाळ हाळ होत आहे.

विविध सामाजिक संघटनेकडून या घटनेचा अत्यंत खेदजनक पद्धतीने निषेध करण्यात येत आहे
महाराष्ट्रातील काँग्रेस , राष्ट्रवादी व सेना हे आघाडी सरकार झोपलेले आहे
जनतेची सुरक्षा करण्यासाठी असमर्थ ठरले आहे


महाराष्ट्र मध्ये मागासवर्गीयवर अन्याय-अत्याचार खून बलात्कार दररोज चालू आहेत
महाराष्ट्र मध्ये अराजकता माजली आहे
जनतेमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्राच्या सरकारने राजीनामा द्यावा यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब व उमरखेड च्या पोलीस निरीक्षक साहेबांनी या घटनेची कसून तपासणी करण्यात यावी गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जलद न्यायालयात हा खटला दाखल करावा व त्याला तात्काळ शिक्षा करण्यात यावी गुन्हेगारांना अटक करण्यात यावे व शिक्षा करण्यात कसल्याही प्रकारची दिरगाई कींवा हलगर्जीपणा करण्यात येऊ नये. धर्मकारे यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *