कंधार भूषण विठ्ठल पेन्टर यांचा पञकार ओंकार लव्हेकर यांच्या वतीने सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

कंधार शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विठ्ठल नारायणराव मुनगीलवार यांना हिंदवी बाणा लाईव च्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून कै. दुर्गादास सराफ पञकार प्रतिष्ठानतर्फे मानाचा समजला जाणारा कंधार भूषण सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

त्याबद्दल त्यांचा सत्कार चालु वार्ताचे पञकार तथा अनुराग विमा सेवा केंद्र , ओंकार लव्हेकर,कंधार यांच्यातर्फे करण्यात आला.

अनेक वर्षापासून ओंकार लव्हेकर हे सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या सर्व तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीचा सन्मान करत असतात त्याचा धागा पकडून कंधार भूषण विठ्ठलचा सदरील सन्मान करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *