नांदेड (जिमाका) दि. 13 :- केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 47 व नियम 81 मध्ये सुधारणा करून विविध शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या सुधारणा 1 एप्रिल 2022 पासून अंमलात येणार आहेत. सर्व संबंधितांनी त्यांच्या वाहनांची पुर्ननोंदणी व परिवहन वाहन मालकांनी योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण विहित मुदतीत करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
नोंदणीचे उद्देश व शुल्क पुढीलप्रमाणे आहे. नोंदणीचे प्रमाणपत्र निर्गमीत करणे, नवीन नोंदणी चिन्ह नियुक्त करणे किंवा नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी इनव्हॅलीड कॅरेज (दिव्यांगजनासाठी अशक्त वाहन) 50 रुपये, मोटर सायकलसाठी नवीन नोंदणी 300 रुपये, नोंदणीचे नुतनीकरण 1 हजार रुपये, तीन चाकी/ क्वाड्रिसायकलसाठी नवीन नोंदणीसाठी 600 रुपये व नोंदणीचे नुतनीकरणासाठी 2 हजार 500 रुपये, हलकी मोटार वाहनात नवीन वाहन नोंदणीसाठी 600 रुपये, नोंदणीचे नुतनीकरण 5 हजार रुपये, मध्यम मालवाहू, प्रवासी वाहनासाठी 1 हजार रुपये, अवजड मालवाहू / प्रवासी वाहनासाठी 1 हजार 500 रुपये, आयात केलेले मोटार वाहन (दोन किंवा तीन चाकी) वाहन नवीन नोंदणीसाठी 2 हजार 500 व नोंदणीचे नुतनीकरणासाठी 10 हजार रुपये, आयात केलेले मोटार वाहन (चार किंवा अधिक चाके) नवीन नोंदणीसाठी 5 हजार व नोंदणीचे नुतनीकरणासाठी 40 हजार रुपये शुल्क आहे. यात उल्लेख न केलेले इतर कोणत्याही वाहनाच्या नवीन नोंदणीसाठी 3 हजार व नोंदणी नुतनीकरणासाठी 6 हजार रुपये शुल्क आकारले जाईल.
नोंदणीचे प्रमाणपत्र फॉर्म 23A मध्ये निर्गमीत केलेले किंवा नूतनीकरण केलेले स्मार्ट कार्ड असल्यास 200 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी अर्ज करण्यास उशीर झाल्यास, मोटार सायकलच्या संदर्भात प्रत्येक महिन्याच्या विलंबासाठी किंवा त्याच्या काही भागासाठी 300 रुपये आणि परिवहन वाहनांसाठी प्रत्येक महिन्याच्या विलंबासाठी किंवा त्याच्या काही भागासाठी 500 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
अनुक्रमांक (10) आणि त्याच्याशी संबंधित नोंदी नंतर म्हणजे 15 वर्षांपेक्षा जुन्या मोटार वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्राचे अनुदान आणि नुतनीकरणासाठी वाहनाची चाचणी घेणे. मोटार सायकलसाठी हस्तचलित 400 रुपये, स्वयंचलितसाठी 500 रुपये. तीन चाकी किंवा हलकी मोटार वाहन किंवा क्वाड्रिसायकलसाठी हस्तचलित 800, स्वयंचलितसाठी 1 हजार रुपये, मध्यम मालवाहू किंवा प्रवासी मोटार वाहनासाठी हस्तचलित आठशे, स्वयंचलित 1 हजार 300 रुपये. अवजड मालवाहू वस्तू किंवा प्रवासी मोटार वाहन हस्तचलितसाठी 1 हजार रुपये, स्वयंचलित 1 हजार 500 रुपये शुल्क राहील.
अनुक्रमांक (11) आणि त्याच्याशी संबंधित नोंदी नंतर 15 वर्षांपेक्षा जुन्या मोटार वाहनांसाठी (वाहतूक) फिटनेस प्रमाणपत्र मंजूर किंवा नूतनीकरण मोटारसायकलसाठी 1 हजार रुपये, तीन चाकी किंवा हलकी मोटार वाहन किंवा क्वाड्रिसायकलसाठी 3 हजार 500, हलकी मोटार वाहनासाठी 7 हजार 500 रुपये, मध्यम मालवाहू किंवा प्रवासी मोटार वाहनासाठी 10 हजार रुपये, अवजड मालवाहू वस्तू किंवा प्रवासी मोटार वाहनासाठी 12 हजार 500 रुपये. तर फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 50 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000