माजी सैनिक संघटनेच्या वतीने कंधार येथील संपर्क कार्यालयात विविध गुणवंताचा सत्कार ; जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांचा पुढाकार

माजी सैनिक संघटनेच्या वतीने कंधार येथील संपर्क कार्यालयात विविध गुणवंताचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

कंधार येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात भरीव काम करणारे व गुणवंत असणाऱ्या पत्रकार , माजी सैनिक व पेंटर यासह सामाजिक कार्यकर्ते यांचा आज शनिवारी दिनांक 15 जानेवारी सत्कार करण्यात आला अशी माहिती जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली.

मराठवाडा स्तरीय शोधवार्ता पुरस्करीत पत्रकार राजेश्वर कांबळे यांना नाहीर झाला आहे त्याबदल त्यांचा व सुट्टी वर येऊन मुलांना प्रशिक्षण देणारे सैनिक शिवहार कागणे आणि कंधार भुषण हिंदवी बाणा लाईव्ह पुरस्करीत विठल मिमिडवाड पेन्टर व सामाजिक कार्यकर्ते परशुराम केंद्रे यांचा आज आजी माजी सैनिक संपर्क कार्यालयात माजी सैनिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी संपर्क कार्यालयात माजी सैनिक  संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, मार्गदर्शक नाना चिवळे, पॅरा मिलट्री तालुकाध्यक्ष संग्राम जायभाये, तालुका उपाध्यक्ष शेख आजीज, कार्याध्यक्ष गोविंद सुर्यवंशी, प्रसिद्ध प्रमुख उमाजी पंदलवाड,  आदीं ची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *