कंधार ता.प्र.
नांदेड ते उदगीर महामार्गावरील मानसपुरी पेट्रोल पंप बहादरपुरा या रस्त्याचे दोन वर्षापासून शिल्लक रस्त्याचे काम रखडल्यामुळे या मुख्य महामार्गावरील हजारो वाहनाची मोठी गर्दी होत आहे .मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मानसपुरी पेट्रोल पंप ते बहादरपुरा या रस्त्याची अक्षरशः चाळनी चांदणी होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत त्याच बरोबर काटेरी कुंपण मुळे रस्ता अरुंद झाल्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांची दमछाक होत आहे.
महामार्गाचे रखडलेले काम सुरू करून तात्काळ या अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करून रस्त्याच्या कडेने काटेरी झुडूप काढून वाहन चालक व नागरिकांची गैरसोय दूर करून प्रचंड होणारी ट्राफिक जाम थांबवण्याची मागणी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांनी निवेदनाद्वारे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे केली आहे.
नांदेड उदगीर महामार्ग नवीन झाल्यामुळे या महामार्गावर दररोज मुखेड उदगीर लातूर जाम जळकोट पुणे जाणाऱ्या हजारो मोठ्या वाहनाची रेल चल सुरू झाली आहे. मात्र मानसपुरी ते बहादरपुरा रस्त्याचे रखडलेले आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष केल्यामुळे राखलेले काम अजूनही सुरुवात होत नाही.
त्यामुळे ही हजारो वाहने मानसपुरी बहादरपुरा गावातील अंतर्गत रस्त्यावर वरून जात आहेत. यापुढे हा रस्ता अरुंद असून या रस्त्यावर काटेरी झुडपांनी अक्षरशा कुंपण घातले आहे त्याचबरोबर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून दररोज अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र प्रशासन अजून झोपीचे सोंग घेत आहे.
नांदेड ते उदगीर महामार्ग ५० चे रखडलेले काम तात्काळ सुरू करा. मानसपुरी ते किल्ला परिसरातून बहादरपुरा अतर्गत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे त्याच बरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेले काटेरी झुडूप काढून वाहन धारक नागरिकांना होणाऱ्या त्रासातून रस्ता मोकळा करून हेळसांड दूर करण्याची मागणीचे निवेदन उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कंधार यांना देण्यात आला आहे