कंधार ;
कंधार तालुक्यातील सिंगल फेस किटकॅट आणि किटकॅट केबल यांची बहुमत आशा गावात जास्त प्रमाणात कमतरता असल्यामुळे कंधार तालुक्यातील जनतेला लाईट बंद च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे 24 जानेवारी पर्यंत कंधार तालुक्यात सिंगल फेज डीपी , किटकॅट , किटकॅट केबल उपलब्ध करून द्यावे अन्यथा महावितरण नांदेड कार्यालयासमोर उपोषणास बसणार असे लेखी निवेदन बालाजी चुकलवाड यांनी इशारा दिला आहे.
24 जानेवारी 2022 पर्यंत तालुक्यात सिंगल फेज डीपी किटकॅट किटकॅट केबल उपलब्ध करून द्या अन्यथा 25 जानेवारी रोजी कार्यकारी अभियंता महावितरण नांदेड कार्यालयासमोर उपोषणास बसणार बालाजी चुकलवाड
कंधार तालुक्यातील सिंगल फेस किटकॅट आणि किटकॅट केबल यांची बहुमत आशा गावात जास्त प्रमाणात कमतरता असल्यामुळे कंधार तालुक्यातील जनतेला लाईट बंद च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.माजी सैनिक संघटनेच्या वतीने कंधार तालुक्यातील m.s.b. अधिकाऱ्यांची वारोवार भेट घेऊन विनंती करण्यात आली पण त्यांचे असे म्हणणे आहे की वरील साहित्य आम्हाला नांदेड वरूनच प्राप्त होत नाही.
आम्हाला वरुन आले तरच आम्ही देऊ. करिता माजी सैनिक संघटना यांच्या वतीने आज नांदेड कार्यकारी अभियंता ची भेट घेऊन विनंती करत आहेत की वरील सर्व साहित्याचा पुरवठा 24 जानेवारी 2022 पर्यंत करण्यात यावा अन्यथा जनतेच्या वतीने माजी सैनिक संघटना 25 जानेवारी 2022 ला आपल्या कार्यालयाच्या समोर साखळी उपोषणास बसेल याला सर्वस्वी जबाबदार महावितरण प्रशासन राहिल असा सज्जड इशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिला आहे.