फुलवाळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळसह परिसरांमध्ये गेल्या कांही दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे शिवारातील हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तर गहू , भुईमूग वर तांबोरा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जुन महिन्यापासुनच म्हणजे जशी खरीप हंगामाच्या पेरणी पासुन कधी अति पाऊस तर कधी पाऊस नसल्यामुळे शेतीचे नुकसान मध्यंतरी ऐन सोयाबिन काढनीच्या वेळी शेतकर्यांवर आसमानी संकट आणि आता या ढगाळ वातावरना मुळे हरभरा,गहु,भुईमुग अशा पिकांवर अळीचा व इतर रोगांच्या अति प्रर्दुभावामुळे अशी अनेक संकटे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुंजले कि काय अशी गत झाल्याचे चित्र आज घडीला दिसत आहे
कमी अधिक पावसामुळे खरीपातील पीक असलेले सोयाबीन, कापूस हातचे गेल्यामुळे बळीराजा अडचणीत आला असताना आता रब्बी पिकेही धोक्यात आली आहेत.
हरभऱ्यावर आळीने हल्ला केला असल्याने रब्बी पिकावरी संक्रांत आली आहे. यावर्षी सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी जमिनीत ओलावा मुबलक प्रमाणात होता त्यामुळे हरभरा गहू त्याच बरोबर रब्बी च्या इतर पिकाचा पेरा समाधान कारक झाला आहे. त्यातच आता मागील कांही दिवसापासून फुलोच्यात आणि घाटीच्या अवस्थेत असलेल्या हरभऱ्यावर आळीने हाल्ला केला आहे.
सध्या फुल आणि घाटे लागत आहेत परंतु किडीच्या प्रादुर्भावामुळे हे पीक धोक्यात आले आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही पीक वाया जाऊ नये याकरिता शेतकऱ्याकडून महागडी कीटकनाशके फवारली जात आहेत. परंतु त्या उपरही किड आटोक्यात येत नसल्याचे चित्र दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.