कंधार ; दत्ताञय एमेकर
भारत हा कृषीप्रधान देश आहे.शेती हा प्रमुख व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.पुर्वी शेती व्यवसाय वृषभराजांच्या सहकार्याने शेतीची कामे शेतकरीराजा करत,सध्या विज्ञानाच्या मदतीने यंत्रयुग असले तरी, वृषभराजाची कष्टाला आजही खेडोपाडी किंमत आहे.
मन्याड खोर्यात काल अशी घटना घडली.ते पाहून आपल्याला नवल वाटेल.कंधार म्हणटले की आठवते एक चळवळीचे राजकारणी केंद्र. त्याचे कारण म्हणजे माजी खासदार व आमदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डाॅ.भाई केशवरावजी साहेब व माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे या जोडगोळीने मन्याड खोर्याला देशपातळीवर गाजवले.
यांच्या क्रांतिभुवन बहाद्दरपुरा ता.कंधार या क्रांति नगरीत एका अनोखी घटना घडली.डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या धर्मपत्नी ग्रामीण लेखीका,मुक्ताई मुद्रणालयाच्या संचालिका, सौ.चंद्रप्रभावतीबाई केशवराव धोंडगे यांनी धोंडगे परिवारात ऐंशीच्या दशकात दाखल झालेला सदस्य म्हणजे प्राणप्रिय “राजा” या नावाचा वृषभ (बैल) अलौकिक,लक्ष्मीकांत होता.२००३ वर्षीच्या मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या ५८ व्या पुण्यतिथी निमित्त सोहळ्यात प्रवचन देण्यासाठी दत्त मंदिर मठसंस्थान बाचोटी ता.कंधारचे मठाधिराज द.भ.प.अवधूत गीरी महाराज आले होते.प्रवचन संपल्यावर महाराजांची पाठवणी करत सौ.चंद्रप्रभावतीबाई धोंडगे माय त्यावेळेस बाहेर आल्या त्यावेळी हा वृषभराज गेट जवळ चरत असतांना महाराजांच्या नजरेस पडला.
वंदनीय अवधूत गीरी महाराज म्हणाले माय या बैलास विकू नका, याचा सांभाळ करा,हा लक्षीकांत आहे.याच्या पाठीवर चक्र अन् गदा आहे.त्यांचे पालन पोषण सौ.चंद्रप्रभावतीबाई धोंडगे माय यांनी जिवापाड केले.डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे व जागतिक गुराखी साहित्य संमेलन यांच्या विचाराला शोभेल असे कार्य मुक्ताईसुताची भार्या सौ.चंद्रप्रभावतीबाई केशवरावजी धोंडगे माय यांनी करुन आपल्या कतृत्वाने पतिश्वरासम भुत दया दाखवत.
बैलाचे लाड करत धोंडगे घराण्याच्या संस्कृतिस शोभणारे कार्य करुन जनतेची वाहऽ ऽ वा मिळविली.जवळपास “राजा” पंधरा वर्षांपासून वयोवृद्ध झाल्यामुळे त्यास कामाला लावलेच नाही.फक्त त्यांची सेवा साहेबराव अंभोरे यांच्या करवी करण्यास लावून सतत त्यांना सांगतांना साहेबराव त्याच्या तब्येततेची काळजी घेत..जवळपास ३०-३५ वर्ष धोंडगे परिवाराच्या शेतीवर कष्टकरत आयुष्य जगल्यानंतर काल पशुवैद्यकीय डाॅक्टर केंद्रे साहेब यांनी सलाईन लावली.साहेबराव अंभोरे सेवाचार्यांनी टाकीचा वैरण टाकुन,त्यांच्या अंगावर उबदार पांघरुण घालुन गरम झोपवले. पण…..! १७\१\२०२२ रोजी मध्यरात्री पौर्णिमेच्या सरते शेवटी व वृषभराचा वार सोमवार हा उजाडतांना राजा बैलाने अखेरचा श्वास घेतला.
सौ.चंद्रप्रभावतीबाई माय धोंडगे यांच्या ईच्छेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार नागझरी कडील मेटच्या शेताकडे जेसीबीने केलेल्या गारीत विधीवत स्वामी महाराज यांच्या शंख गर्जनेसह मंत्रोच्चारात करण्यात आले.अंत्यविधी करण्याआधी बैल राजास टिळा लावला.अंघोळ घातली.खोसल्याचा पटका भरजरी वस्त्राचे कफनासोबत फुलांच्या माळा घातल्या, त्याचे रुप राजबिंड्यासम सोज्वळ दिसत होते.पुजा-अर्चा सौ.चंद्रप्रभावतीबाई धोंडगे माय यांनी आरती करुन साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
एखाद्या मानवास अखेरचा निरोप दिला जातो,त्यासम
सौ.चंद्रप्रभावतीबाई केशवराव धोंडगे माय यांनी
वृषभराजाचे सर्व सोपस्कार पूर्ण करुन अनोखी भुत दया दाखवून अनेकांच्या तोंडी या अनोख्या अंत्यसंस्काराची चर्चा पंचक्रोशीत चर्चील्या जात आहे.वंदनीय अवधूत गीरी महाराज यांची आज्ञापाळून
सौ.चंद्रप्रभावतीबाई केशवराव धोंडगे माय, त्यांची सुकन्या सौ.जयक्रांति अशोकराव गवते व नात कु.राजलक्ष्मी पुरुषोत्तमराव धोंडगे या चिमुकली सहीत सर्वांनी वृषभराजाचे पुजन करुन सूर्यमुखी म्हणजे पुर्वेस तोंड करुन राजेशाही अंत्यसंस्कार करुन एक आदर्श ऐतिहासिक उदाहरण अनेकांपुढे ठेवला आहे.असे आपल्या कष्टकरी राजास अखेरचा निरोप देणारे अगदी बोटावर मोजता येईल अशी नगण्यच संख्या दिसते आपल्या मेहनतीच्या जीवावर मालक शेतकरी राजाने वृषभराजस “गरज सरो वैद्य मरो “न करता बैलाच्या वृधापकाळात गत कालिन कष्टाला किंमत देवून शेवटचा श्वास असे पर्यंत सांभाळून कृतज्ञतापूर्वक अंत्यसंस्कार करण्याची जणु प्रेरणा देण्याचे काम सौ.चंद्रप्रभावतीबाई धोंडगे माय यांनी आदर्श कार्य केले.
त्याच्या कार्याला मानाची जयक्रांति! अंत्यसंस्कार झाल्यानंतर उपस्थितांना दानाच्या स्वरुपात दहा-पंधरा हजार वाटप करुन दानत्वाची साक्ष दिली.मन्याड खोर्यातील पंचक्रोशीत वृषभराजाचा अंत्यसंस्कार “न भुतो न भविष्यती” असाच म्हणावे लागेल. अंत्यसंस्कार प्रसंगी साहेबराव अंबुरे,तुकाराम गायकवाड, सौ.शोभा साहेबराव अंबुरे, बाबन लखेरे, रवि कांबळे, माधव वंजे,गणेश साहेबराव अंबुरे,दत्ता सुखदेव,सारथी ऐनवाड आदीजण उपस्थित होते.जय राजा…!जय वृषभराजा…जय नंदीराज,….जय मुक्ताई, जय योगीराज…जय गुराखी राजा……जयक्रांति…..हर हर महादेव,एकबार शंभूच्या नावाने हर बोला..!