कुळाचार वाढला की धर्म वाढतो -एकनाथ नामदेव महाराज उमरजकर


मुखेड: (दादाराव आगलावे)



कुळाचार म्हणजे कुळाचे आचरण करणे होय. आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या काळाचे आचरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जो कोणी आपल्या कुळाचे आचरण करणार नाही त्याचे पिंडदान करण्यासाठी कोणीही उरणार नाही, कुळाचार वाढला की धर्म आपोआप वाढतो असे प्रतिपादन उमरज संस्थानचे मठाधिपती श्री संत एकनाथ नामदेव महाराज उमरजकर यांनी केले.

तालुक्यातील वर्ताळा येथील श्री संत माणिक प्रभू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी समाधी सोहळ्यानिमित्त भक्तांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर, सदानंद गुरुजी रायवाडीकर, परशुराम महाराज भाटापूरकर, दिलीप महाराज, रमेश महाराज, नरसिंग महाराज शिंदे, संभाजी महाराज शेळके, पवन पोद्दार, श्रीकांत गुरुजी थगनारे, खुशाल महाराज जायभाये, व्यंकटराव डावकरे, लहू महाराज सिरसीकर, विश्वकर्मा महाराज पांचाळ, मृदंगाचार्य विशालजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. एकनाथ नामदेव महाराज उमरजकर पुढे म्हणाले की, हिंदू धर्म हा खूप पुरातन धर्म आहे तेव्हा धर्म आहे परंतु आपण हिंदू धर्माची जातीजातीमध्ये विभागणी करून आपण पेंगू बनत चाललो आहोत. आपण कुळाचे आचरण करा आपोआप धर्म प्रसार होण्यासाठी वेळ लागणार नाही. दुःखी जनांचा उद्धार करण्यासाठी संतांनी पृथ्वीवर अवतार घेतला आहे. सध्या कोरोनाचे सावट आहे. आणखी काही विभागांमध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी काही शंका व्यक्त करतात परंतु लस ही अत्यंत सुरक्षित असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी लस घेतली पाहिजे तरच आपण जगू अआसेही त्यांनी भाविकांना सांगितले.


मी कुठल्या पक्षाचा पुरस्कर्ता नाही परंतु आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे हिंदू धर्माचे शेर जन्माला आला आहेत. रामाचे मंदिर बनले पाहिजे हा अट्टाहास धरून त्यांनी ते पूर्णत्वाकडे नेले आहे. धर्मासाठी चांगलं होत असेल तर मतभेद बाजूला सारून आपण एकत्रित आले पाहिजे अशी भावनाही एकनाथ नामदेव महाराज यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्यातली भक्ती वाढली पाहिजे भाव वाढला पाहिजे आपोआपच धर्म वाढतो भक्ती वाढली की सुख येते धर्मासाठी जगणं सोडून जातीसाठी जगणं सुरू आहे जातीसाठी आपण वागू नका धर्मासाठी जगायला शिका नाहीतर अंत व्हायला वेळ लागणार नाही असेही त्यांनी सांगीतले. प्रारंभी संत माणिक प्रभू यात्रा कमिटीच्या वतीने लक्ष्मण डावकरे, राजू गुरुजी केरुरे यांनी महाराजांवरती पुष्पवृष्टी केली. शेवटी महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी वर्ताळा सह आडमाळवाडी, उमरज, शेळकेवाडी, सांगवी, वर्ताळा तांडा, हनुमंत वाडी, गुंटूर, दैठणा, लादगा, सावरगाव, सांगवी येथील भाविक उपस्थित होते. कार्यक्रमास सरपंच प्रतिनीधी सुर्यकांत शेळके, उपसरपंच राजू राठोड, शेषराव गुरुजी डावकरे, नामदेव आगलावे, उत्तमराव आगलावे, लक्ष्मण डावकरे, शिवाजी आगलावे,शिवाजी गुरुजी डावखरे, लक्ष्मण आडे,
किशन गुरुजी आगलावे, राजू गुरुजी केरुरे, बालाजी जायभाये, बालाजी डावकरे, माधव आटकळे, शिवाजी आगलावे, भारत गुरुजी जायेभाये, आनंद गुरुजी आगलावे, मधुकर पाटील कागणे, माजी सरपंच माधवराव डावकरे, विश्वांभर जायेभाये, किशन जायेभाये, पोलीस कर्मचारी ईश्वर आगलावे,

रमेश डावकरे, प्रभाकर डावकरे, भगवानराव जायेभाये, नरसिंग महाराज गुंटूर, संग्राम शिंदे, आनंद भंडारवार, तुकाराम वडजे, श्रीराम पाटील पांडुरणीकर, दादाराव पाटील पांडुरणीकर, सारंग बकवाड, विषय तज्ञ सुर्यवंशी सर, मैनोदीन सय्यद, जनार्धन कांगणे, खंदारे भावजी, मनोहर आगलावे, बालाजी आप्पाराव डावकरे, धोंडीबा डावकरे, नारायण डावकरे, एकनाथ डावकरे, मोतीराम डावकरे, मारोती तेलंगेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात्रा कमिटीच्या सदस्यांनी अथक परिश्रम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *