प्रतिनिधी, कंधार
येथील पत्रकार राजेश्वर कांबळे यांना उदगीर तालुका पत्रकार संघाचा वर्ष २०२१ चा मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कंधारचे कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी शरद मंडलीक यांच्या हस्ते मंगळवारी २५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसीलदार संतोष कामठेकर, नायब तहसीलदार नयना कुलकर्णी, निवडणूक समन्वय मन्मथ थोटे, संगायोचे महसूल सहायक बारकुजी मोरे, वरिष्ठ लिपिक प्रतिक जोंधळे, अविनाश पानपट्टे, कनिष्ठ लिपिक बाबुराव अभंगे, आॅपरेटर गंगाधर गोंटे, मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड, सहशिक्षक चांदोबा कनकवळे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.