२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिना निमित्त तहसील कार्यालय कंधार  बक्षीस  वितरण संपन्न

कंधार 

भारतीय निवडणूक आयोग स्थापन दिवस हा राष्ट्रीय मतदार दिना निमित्त तहसील कार्यालय कंधार येथे मतदार जनजागरण करण्यासाठी २० जानेवारी २०२२ आकाश कंदिल,भित्तिपत्रक, संकल्प पत्र अशा विविध स्पर्धा तहसील कार्यालय मार्फत घेण्यात आल्या. त्या स्पर्धेत यशवंत विद्यार्थ्यांना आज तहसील कार्यालयात सन्मान पत्र,गुलाब पुष्प, ड्राॅईंग वही अन् लेखनी उपविभागीय अधिकारी मा.शरदराव मंडलिक साहेब व तहसीलदार मार्फत.संतोष कामठेकर साहेब यांचे समर्थ हस्ते प्रदान करण्यात आले.तसेच मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर,हरहुन्नरी कलावंत दत्तात्रय एमेकर गुरुजी,कलाध्यपिका सौ.सुमित्राताई धोंडगे मॅडम, सुमनताई चिंतेवार मॅडम, विद्याताई सिरसे मॅडम सर्व गुरुवर्यांचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धेत यशवंत झालेले विद्यार्थी

भित्तिपत्रक स्पर्धेत यशस्वी स्पर्धक

प्रथम-कु.श्रृती गिरीश एमेकर. 

व्दितीय-कु.आर्या नरेंद्र राठोडकर 

          कु.शुभांगी जनार्दन केंद्रे

तृतीय-कु.नंदीनी दिनेश व्यास

         कु.शुभदा हनमंत मुसळे

प्रोत्साहनपर

         कु.शारदा सुभाष कोटाळे

         आनंद रामभाऊ तायडे

         कु.प्रेरणा बाबुराव पानपट्टे

         कु.ऐश्वर्या प्रल्हाद मंगनाळे

         कु.सुवर्णा ज्ञानोबा केंद्रे 

         कु.सह्याद्री सुभाष कोटाळे

          कु.श्रेया गिरीश एमेकर 

आकाश कंदिल स्पर्धेत यशवंत 

 प्रथम-कु.सुवर्णा ज्ञानोबा केंद्रे 

व्दितीय-कु.श्रीया अंगद सुकणे

तृतीय-कु.आर्या नरेंद्र राठोडकर 

         सिध्देश्वर जनार्दन केंद्रे

संकल्प पत्र स्पर्धेत 

यशराज संतोष बोरगाव

श्रेया यादव पेठकर 

कु.दुर्गा शिवराज रुंजे

या सर्व गुणवंत 

यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थापक व संचालक- माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब, सचिव-माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब, अध्यक्ष-डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तमजी धोंडगे साहेब, सहसचिव अॅड मुक्तेश्वरारावजी धोंडगे साहेब शालेय समिती अध्यक्षा लिलाताई आंबटवाड मॅडम,मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर, उपमुख्याध्यापक डी.पी.कदम सर,पर्यवेक्षक रमाकांत बडे सर व तुकाराम कारागीर सर 

यांचे सहित सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु-भगीनींनी अभिनंदन करून मानाची कोटी-कोटी जयक्रांति केली.या प्रसंगी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचलन मन्मथजी थोंटे सर यांनी केले.बाबुराव अभंगे सर, पत्रकार राजेश्ववर कांबळे सर,सर्व बी.एल.ओ.अन् कंधार तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *