राष्ट्रीय महामार्गामध्ये संपादीत झालेल्या जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी मागासवर्गीय विधवा महिलेचे कंधारात आमरण उपोषण

कंधार

मौ. मंगरू ता. लोहा जि.नांदेड येथील गट क्र. ८९ मौ. मंगरूळ ता. लोहा येथील राष्ट्रीय महामार्गामध्ये संपादीत झालेल्या जमिनीचा मावेजा तात्काळ वाटप करण्यात यावा यासाठी उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी कार्यालय, कंधार येथे दि. २५/०१/२०२२ रोजी मागासवर्गीय विधवा महिलेचे कंधारात आमरण उपोषण सुरू आहे .

प्रमुख मागण्या

१. विधवा मागासवर्गीय शेतकरी महिला श्रीमती सुरेखा शिवाजी वाघमारे राहणार मौ. मंगरू ता. लोहा जि.नांदेड येथील गट क्र. ८९ मौ. मंगरूळ ता. लोहा येथील राष्ट्रीय महामार्गामध्ये संपादीत झालेल्या जमिनीचा मावेजा तात्काळ वाटप करण्यात यावा

२. गेली २ वर्षापासुन पुर्णतःह अहवाल दाखल होऊन ही वेळोवळी फेर चौकशीच्या नावाखाली टाळाटाळ करून मावेजा पासुन वंचीत ठेवल्या प्रकरणी दोषींवर कार्यवाही करावी

३. महामार्गात संपादीत झालेल्या जमिनीचा मावेजा तात्काळ वाटप करण्यात यावा.

अशी मागण्या उपोषण कर्ते : श्रीमती सुरेखा शिवाजी वाघमारे रा. मंगरूळ यांनी केली आहे. विशेष म्हणजे न्याय मिळण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवसी हे उपोषण चालू होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *