– यवतमाळ ; भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व प्रथम जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ) मा.श्री.प्रमोद सुर्यवंशी साहेब यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले व त्यानंतर त्यांचे शुभहस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.*भारतमाता की जय,वंदेमातरम”,” प्रजासत्ताक दिन चिरायू होवो” अशा घोषणा देऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मा.श्री. प्रमोद सुर्यवंशी साहेबांनी स्काऊट- गाईड चळवळीतील सर्व कब-बुलबुल ,स्काऊट- गाईड ,रोव्हर- रेंजर ,बनी-टमटोला युनिट लिडर व सर्व शाळा प्रमुखांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सेवानिवृत शिक्षणाधिकारी श्री.श्रीराम खोपे साहेब ,निरंतर शिक्षण विभागाचे श्री.मार्कंड साहेब , सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी श्री.मारोतराव हटकरे,सेवानिवृत मुख्याध्यापक श्री.महादेव गिरूळकर ,लिडर ट्रेनर (बुलबुल) सौ.सुरेखा टोणे, सेवावृत्त मुख्याध्यापक श्री.रामभाऊ बोरवार,श्री.दिपक बाभुळकर, सेवानिवृत केंद्रप्रमुख श्री.नागोराव काकपुरे,जेष्ठ नागरिक श्री.अशोक टोणे , जिल्हा संघटक ( स्काऊट) श्री. गजानन गायकवाड, जिल्हा संघटक (गाईड) श्रीमती कविता पवार , राज्य कार्यालय मुंबईचे रोखपाल श्री.नितिन गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ लिपिक श्री.पराग खुजे ,कनिष्ठ लिपिक श्री. संजय केवदे, शिपाई श्रीमती.दिशा सिंगारकर आणि श्री.साजिद मन्सूरी यांनी परिश्रम घेतले.