14 ते 28 जानेवारी 2022
‘
महाराष्ट्र राज्य निर्मितीत मराठी भाषेचा सिंहाचा वाटा आहे. ज्ञानभाषा लोक भाषा एक झाल्यास सर्वसामान्य लोक शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. मराठी ही ज्ञानाची, संवादाची, व व्यवहाराची भाषा आहे, इतर भाषेचे ज्ञान अवगत करताना मायबोली मराठी भाषेचे संवर्धन करणे आवश्यक आहे, मराठी आपली मायबोली आहे, तिच्यापासून आपण दूर जाता कामा नये.मराठी भाषेला पहिले प्राधान्य द्यावे.लोकांना आज सरकारी नोकरी हवी आहे,सरकारी गाडी हवी आहे, पण शिक्षणासाठी सरकारी शाळा नको,असे काही लोकांना वाटत आहे,यावर कुठेतरी चिंतन होण्याची गरज आहे. म्हणूनच हा लेखन प्रपंच
राज्यातील मराठी भाषा संवर्धन व विकास व्हावा म्हणून मराठी भाषा विभाग सातत्याने पुढाकार घेऊन कार्यरत आहे. सन 2013 पासून 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. सध्याच्या covid-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अनेक ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त कार्यक्रम ऑनलाइन घेताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील सर्वसाधुसंतांनी, साहित्यिकांनी,कवींनी मराठी भाषा जतन करण्याचा प्रयत्न केला आहे, नुकताच महाराष्ट्र शासनाने सर्व दुकानांवरील पाट्या मराठीमध्ये लिहून लावाव्यात असा आदेश काढला आहे, या आदेशाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे,प्रत्यक्ष त्याचीअंमलबजावणी करणे,आपल्या सर्वाच्या हाती आहे, दैनंदिन जीवनात आपण विचार करूनच मराठी भाषा वापरली पाहिजे, मराठी भाषेतून साहित्य लिहिणाऱ्या महान लेखकांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘ज्ञानपीठ’ दिला जातो आज पर्यंत वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) वि.स.खांडेकर वि. दा. करंदीकर डॉ. भालचंद्र नेमाडे यांना पुरस्कार दिलेले आहेत
27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो, तसेच दरवर्षी 14 ते 28 जानेवारी हा मराठी भाषेचा विकास व संवर्धन व्हावे, म्हणून पंधरवडा पाळला जातो, मराठी ही भाषा महाराष्ट्राच्या घराघरात बोलली जावी मराठी भाषेतील पुस्तके वाचली पाहिजेत, पालकांनी आपल्या पाल्याला मराठी शाळेत घातले पाहिजे, बाजारातून मराठी भाषेची असलेली पुस्तके आणून द्यावीत कोर्टाचे कामकाज मराठीतून चालावे, मराठी आपली मायबोली आहे. तिच्यापासून आपण दूर जाता कामा नये.मराठी भाषेला पहिले प्राधान्य द्यावे.लोकांना आज सरकारी नोकरी हवी आहे. सरकारी गाडी हवी आहे पण सरकारी शाळा नको असे वाटत आहे .त्यामुळे इंग्रजी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .
मराठी भाषेला, मराठी शाळेला दुय्यम मानून इतर भाषेचा आदर करताना अनेक जण दिसत आहेत. येणारी पिढी मराठी भाषेपासून दूर जाताना दिसत आहे.आई -वडील ऐवजी मम्मी,माॅम -पप्पा,डॅडी ऑंन्टी असे शब्द वापरले जात आहेत,
शेजारील व्यक्तीने इंग्रजी स्कूल मध्ये त्यांचा मुलगा पाठविला म्हणून आपणही इंग्रजी स्कूलला पाठवावे. अशी काही पालकांची भावना तयार झाली आहे. सकाळपासूनच काही लोक ‘गुडमॉर्निंग ‘म्हणून दिवसांची सुरुवात करतात ,फोनवर हॅलो,हाय म्हणून बोलतात .घरादारावर इंग्रजी पाट्या लावताना दिसतात, दोन ते तीन शब्द इंग्रजीत बोलले म्हणजे आपण फारच मोठे झालो आहोत,असा काही जणांचा गोड गैरसमज झाला आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ‘राज्यव्यवहारकोश’ पूर्ण मराठीतून आहे आणि छत्रपती संभाजीराजांनी लिहिलेला’बुधभूषण’हा ग्रंथ ही मराठीतूनच आहे पण अलीकडे इंग्रजीचा वापर जास्त करण्यात येत आहे. साधी साधी वाक्य इंग्रजी मध्ये बोलत जात आहेत.
ओके,सॉरी,गुडनाईट ,गुड, राईट ,लेप्ट, लॉन्स ,रेस्टॉरंट ,वेटर ,माॅल्स अशी कितीतरी शब्द बोलले जात आहेत. त्यामुळे काही मराठी शब्द ऐकण्यास सुद्धा मिळत नाहीत.अभियंता, कोषाध्यक्ष, गुरुजी मास्तर परममित्र बाबा,तात्या ,काकी ,काकू मावशी, पुत्र, कन्या असे शब्द कमी बोलले जात आहेत. असे मला वाटते, पंधरवड्यात विविध मराठी भाषेतील नामवंत व्यक्तींचे परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा शिबिरांचे आयोजन प्रश्नमंजूषा ,निबंध कवितालेखन, आधुनिक प्रचार आणि प्रसार मराठीमाध्यमातूनच करण्यासाठी धडपड करावी लागणार आहे, मराठीभाषेचे कामकाजा बाबत समाजात जागृती निर्माण करावी.
पुस्तक प्रकाशन, हस्ताक्षर वाद-विवाद, अंताक्षरी,शब्दकोडी,ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन,काव्यरचना,मुलाखती घेणे एफ,एम, रेडिओवर कार्यक्रम प्रसारित करणे,असे वेगवेगळे उपक्रम करून मराठीचा दर्जा वाढवता येतो ,संवाद साधण्या साठी वापरले जाणारे एकमेव साधन म्हणजे भाषा होय ,मौखिक भाषेत तोंडाद्वारे निघणाऱ्या ध्वनीचा समावेश होतो.लेखी भाषेचा वापर आजवर फक्त मानवानेच केला आहे, लेखी भाषा शिकण्यासाठी शिक्षणाची गरज असते, सांकेतिक भाषेतून लहान मुलांना डोळे, कान, हात ,आणि पाय अशा मानवी अवयवांचा समावेश होतो, हे शिकविता येते,
जगभरात बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये पंधराव्या व भारतात चौथ्या स्थानावर मराठी भाषा बोलली जाते ,मराठी ही भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी एक आहे .माझ्या मराठीची बोलू कौतुके। परी अमृतातेही पैजा जिंके ।।असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली बाराव्या शतकात लिहुन ठेवले आहेत,
‘जिथे पिकते तिथे विकत नाही ‘असे म्हणतात असं काही नाही ,आई समोर असताना आईचे महत्त्व जाणवते का? तसे आहे जाणवत नाही, दुधात साखर टाकल्यानंतर साखर विरघळून जाते तसे आपण मराठी भाषेची एकरूप झाले पाहिजे,मराठी भाषेला अनेक वर्षांचा इतिहास आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेतून या मागील पिढीने जवळ जवळ आपण सगळे शिकलेले आहोत. शाळेचे शिक्षक मराठी भाषा आपणास शिकवतात.
सध्याचे उदाहरण द्यायचा असेल तर सोलापूर जिल्ह्यातील माननीय रणजितसिंह डिसले गुरुजींनी ‘जागतिक शिक्षक पुरस्कार ‘देण्यात आला आहे, यातून आपणांस घेण्यासारखे बरेच काही आहे ते मराठी शाळेचे शिक्षक आहेत, तरीही एवढी मोठी झेप त्यांनी मराठीतून घेतलेली आहे , केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मराठी माध्यमातून देऊन माननीय विश्वास नांगरे पाटील आज एवढ्या मोठ्या पदावर विराजमान झालेले आहेत ,म्हणून मराठी भाषा टिकली तरच समाज टिकेल आणि येणार्या पुढच्या पिढीची जडणघडण चांगली होईल, त्यासाठी मराठी भाषा जिवंत राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.
‘वाढवू मराठी ,गाजवू मराठी ,आणि बाळकडू म्हणून पाजवू मराठी ‘किती छान रचना केली आहे,
माझ्या मराठी मातीचा ।लावा ललाटास टिळा । हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा।।
असे आपण एवढा मोठा मान -सन्मान मराठीला देतो ,म्हणूनच असे म्हणतात की “लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी असे सुंदर वर्णन कवी करताना दिसतात,”
माय मराठी गळ्यात घाली। लोककलेचे लेणं ।मराठ मोळं गाणं हे लाख मोलाच सोनं।। हजारो वर्षापूर्वी लिहिला गेलेला श्रवणबेळ्गोळ येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळतो, म्हणून मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मराठी ही ज्ञानाची संवादाची व व्यवहाराची भाषा आहे, इतर भाषेचे ज्ञान अवगत करताना मायबोली मराठी भाषेचे संवर्धन करणं आवश्यक आहे, शिक्षण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचते करायचे असेल तर ती मातृभाषेतूनच द्यावे लागेल, ज्ञानभाषा व लोकभाषा एक झाल्यास सर्वसामान्य लोक शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, असे स्पष्ट महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेले होते, महाराष्ट्र राज्य निर्मितीत मराठी भाषेचा सिंहाचा वाटा आहे,त्यासाठी नवा विचार ,नवे रंगरूप घेऊन मराठी भाषा संपन्न बनवावी व याच बरोबर इतर भाषांचाही तिरस्कार करू नये,
साहित्यिक
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपत
अहमदनगर
भ्रमणध्वनी: 99 21 20 85 63