कंधार
दिनांक 26 जानेवारी रोजी विश्रामगृह कंधार येथे बंजारा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर. संत सेवालाल महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समितीची कार्यकारिणी निवड करण्यात आली.
जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे सदस्य. उत्तम चव्हाण यांची तर कार्याध्यक्षपदी श्रीराम जाधव यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष उद्धव राठोड, सचिव प्रवीण पवार ,सहसचिव विलास जाधव ,सह कार्याध्यक्ष रवी राठोड, कोषाध्यक्ष सचिन जाधव, संयोजकपदी प्रवीण राठोड ,विनोद राठोड, जगदीश राठोड, रमेश राठोड ,सुधाकर राठोड ,कार्यकारणी सदस्य मुन्ना पवार ,माधव जाधव ,विचारवंत पवार, बरमानंद जाधव ,सोशल मीडिया प्रमुख गजानन चव्हाण, राजू पवार ,संतोष आडे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून पंकज पवार यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस सुंदरसिंग जाधव अँड. भगवान जाधव, फुलसींग राठोड,सुरेश राठोड, सुनील राठोड, सुधाकर पवार डॉ. परविन जाधव, शिवकुमार जाधव ,माधव जाधव धर्मापुरीकर ,गुलाब पवार ,रमेश राठोड ,राजू पवार विलास जाधव ,रवि राठोड, विनोद राठोड ,अरविंद पवार ,यांची उपस्थिती होती.