काटकळंबा पाणलोट प्रकल्पात मागील दोन वर्षांपासून माथा ते पायथा संकल्पनेनुसार पडीक क्षेत्रावर सलग समतल चर,जल शोषक चर व वहिती क्षेत्रावर बांध बंदिस्ती, फळबाग आदी उपक्रम प्रगतीपथावर आहेत तसेच हवामान बदल अनुकूल प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक हवामान अनुकूल प्रात्यक्षिक हाती घेण्यात आले आहेत. या कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना मांडवकर यांनी प्रकल्पात झालेल्या कामाचा दर्जा चांगला असल्याचे समाधान व्यक्त करून प्रकल्पाचा प्रवास योग्य दिशेने होत असून येत्या काही दिवसात गाव जल स्वयंपूर्ण बनेल असे मत व्यक्त केले.तसेच गावाने पाण्याचा आराखडा मांडून पीक नियोजन करावे असा सल्ला दिला. ॲटलस काप्को संस्थेमार्फत प्रेरक प्रवेश उपक्रमातून येथील जि. प. शाळेस दूरदर्शन संच व व्यायाम साहित्य भेट देण्यात आले.
यावेळी त्यांनी उपस्थित पाणलोट समिती, गावकरी व संस्था कार्यकर्त्यांना झालेले काम टिकवून ठेवण्यासाठी देखभाल आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले.
सदरील भेटी दरम्यान युगंधर मांडवकर यांनी संस्था कार्यकर्त्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी समितीचे सचिव मोहन पवार यांनी गावातील जुन्या विहिरीचे गाळ काढण्यासाठी सहकार्य करण्यासंदर्भात ॲटलस काप्को संस्थेकडे मागणी मांडली.
भेटी दरम्यान जय शिवराय पाणलोट विकास समितीचे सचिव मोहन पवार, सदस्य सुभाष हणमंत मोरे, व्यंकटराव हम्पल्ले, जि. प. शाळेचे सहशिक्षक हत्ते, महेंद्र चावरे, जलदूत रामदास बस्वदे, अनुसया घंटेवाड, आशाबाई कुठारे, संस्था प्रतिनिधी गंगाधर कानगुलवार, सचिन बाबळे, गंगामनी श्रीगिरे गावकरी, पाणलोट समिती सदस्य, बचत गटातील महिला उपस्थित होते.