अहो…साखरेपेक्षा गोडवा


खरं तर या शब्दात साखरेपेक्षा गोडवा आहे.. पण अहो अशी हाक ऐकली की पुरुषांच्या सगळ्या नसा जाग्या होत असतील कारण त्या अहो मधे जी ताकद आहे ती कशातच नाही..


काहीतरी हवय म्हणुन समोरून येणारा अहो आणि चोरी पकडली गेल्यावर येणारा अहो त्यानंतर त्या अहोची खोटं लपवण्यासाठी उडालेली धांदल हे सगळं आमच्या नजरेतून कधीच सुटत नाही.. बायकोला मनवण्यासाठी चाललेली धडपड फक्त बघतच रहावी.


अहो चा अरे झाला मग तो बाबाही अरे झाला कारण तो मित्र म्हणुन जवळ आला .. समवयस्क असल्याने हा फरक पडला असेल कदाचित.. माझी आजी एकदा म्हणाली होती अरे काय म्हणतेस?? गडी आहे का तो तुझा??.. कोणी साहेब म्हणतं तर कोणी शेठ तर कोणी अजुन काही.. आता तर हे प्रकरण बेबीवर आलं.. इथुन पुढे काय असावं बरं ??? .. There s no yesterday , There is no tomorrow .. Only Today .. अशा पध्दतीने जगत असलो तरीही पुढच्या पिढीबदल कुतुहल हे कायमच रहातं .. बायकोलाही अहो म्हणणारे मी पाहिलेत हा.. खूपच वेगळा रोमॅन्टिकपणा त्या शब्दात अनेकदा दिसतो.. कालच टिव्हीवर एका शो मधे पाहिलं हार्ट बीट्स चं पेंड्न्ट तो तिच्या गळ्यात घालतो आणि जेव्हा तु एकटी असशील तेव्हा हे माझ्या हृदयाचे ठोके तुला कायम माझी सोबत म्हणुन राहतील.. इतकं रोमॅन्टिक होतं ते बस.. आतुन बाहेरुन मोहरुन गेले..

अहो वरुन बेबीवर आलो पण फीलींग्ज त्याच राहिल्या कारण त्यातच सगळं आयुष्याचं सार आहे.. कोणीही सोबत नसतं मेल्यानंतर १ मिनीटात बॉडी होते. कोणी नावही घेत नाही इतकं लाइफ अनप्रेडीक्टेबल असताना आपण कोणाला तरी जीव लावतो आणि ते सुखद क्षण अनुभवतो.. कालच f.c. रोडवर एक तरुण मुलगा त्याच्या मैत्रीणीला डोक्यावर हात ठेवुन शपथ घेताना पाहिलं आणि मी माझ्या मित्राला म्हटलं हे प्रेम पुढे जाईल कारे ?? तो म्हणाला या क्षणाला त्यांना बरं वाटतय ना म्हणजेच काय वर्तमान काळ हाच खरा काळ.. आपल्या अवतीभवती अशी काही मंडळी असतात शोन्या बाबु अहो बेबी बबड्या हीच माझ्या लेखात डोकावतात आणि खुप काही शिकवुनही जातात..


पुस्तके वाचा .. सोबत माणसेही वाचा..


सोनल गोडबोले
लेखिका.. बियॉन्ड सेक्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *