कंधार ; ता.प्र.
बीट-उस्माननगर गशिअ कार्यालय,कंधार येथील उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर हे विविध उपक्रम राबवत असतात.त्यानी लॉकडाऊन काळात अॉनलाईन नवोदय , मिशन शिष्यवृत्ती परीक्षा , बिटस्तरीय शिक्षण परिषद, गुणवत्ता तपासणी,वृक्षारोपन ,इंग्रजी प्रशिक्षण ,विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चिती ,युडायस कार्यशाळा यासह अनेक उपक्रम त्यांनी आपल्या बिट मध्ये राबवली आहेत, शिक्षकानाही शिक्षक पुरस्कार,महिला दिना निमित्त स्पर्धा तसेच अॉनलाईन स्पर्धा घेवुन पुरस्काराने गौरविले आहे.
विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांनी युजीसी मान्यता प्राप्त सावित्रीबाई फुले विद्यापीठ,पुणे आयोजित राज्यस्तरीय पाञता परीक्षा (सेट) परीक्षेत त्यांना प्रा.डॉ.राजेश्वर डुडूकनाळे,प्रा.डॉ.कत्तुरवार,प्रा.डॉ.मारुती माने,प्रा.डॉ.निळकंठ वडजे यांचे मार्गदर्शन लाभले तर परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल कंधार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय येरमे,सर्व शि.वि.अ. सतिश व्यवहारे,राजेश्वर पांडे,सौ.अंजली कापसे, सर्व केंद्रप्रमुख,साधनव्यक्ती,विषयतज्ञ,व कार्यालयातील कर्मचारी व तालुक्यातील शिक्षक मंडळी यांनी त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.