१०२ वर्षाचे डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे चष्म्या शिवाय वाचतात वर्तमानपत्र!

कंधार 

सध्याच्या अधुनिक युगात वाचन संस्कृती पासून दूर जावून, सोशल मिडियात गुरफटून गेली असतांना वाचन संस्कृती जणु कृतिम श्वासोच्छ्वासावर आहे.कालपरवा म्हणजे ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला २५ जानेवारी रोजी भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रातील ख्यातनाम लावणी गान साम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना “पद्मश्री”पुरस्काराने गौरविण्यात आले.

आज  शतकोत्सवी वाढदिवस साजरा करणारे व्यक्तीमत्व म्हणजे डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांनी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील त्यांच्या “मुक्ताईप्रभा”निवास्थानी उत्कृष्ट लावणी गायीका सुलोचनाताई चव्हाण या कलावंताच्या जीवनावर आलेला गौरव लेख चष्म्या शिवाय वाचन १०२ व्या वर्षीही अगदी सहज वाचन करतांना,त्यांचा सारथी अभंग लोखंडे मजरे धर्मापुरीकर यांना हा क्षण आपल्या मोबाईलवर टिपला.

नंतर मला सोशल मिडियावर पाठवला.हे पाहून मला या सुंदर अन्त्यां ऐतिहासिक छायाचित्र पाहून लिहिण्या मोह आवरता आला नाही.आयुष्य शतकोत्तर वाढदिवस १०२ व्या साजरा झाला. आजही त्यांचा वाचण्याचा छंद तोच आहे. त्याच इच्छाशक्तीने!या लावणी गानसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी अख्या महाराष्ट्रात आन,बान,शान असलेल्या लावणीस सुमधुर आवाजाने चार चांद लागले.डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे हे लोककला दर्दी आहेत.गुराखीगडी जागतिक गुराखी साहित्य संमेलनात जीभजोड साहित्य सहित लोककलेला गुराखीपिठ मिळवून दिले.दक्षिण भारतात सर्वात मोठी माळेगाव यात्रा भरते त्या यात्रेत कलावंतावर होत असलेला अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी केले.

एवढेच काय बाज्यातली हलगी असो वा सुर का सनई वादकांना शाबसकी देवून त्यांच्या कलेस दाद देत कधी-कधी आर्थिक बक्षीस देवून आपली कलेप्रती असलेली निष्ठा, जिव्हाळा कायम ठेवला.त्यांच्या नेत्रास ना चष्मा ना कानास श्रवणयंत्र नाही ना तोल सांभाळण्या काठीचा आधार असे विद्रोही विचारवंताचे व्यक्तीमत्व तरुणाईस लाजवणारे आजच्या वर्तमानात काळात पाहयला मिळते!”विद्या हेच जीवन! अविद्या हेच मरण!! हे ब्रीद उराशी बाळगून अख्या मन्याड खोर्‍यातील दगड-गोटाळासहित सर्व तरुणाईस निर्धोकपणे जीवन जगण्याचा कानमंत्र शैक्षणिक संस्थेची उभारणी मातृदैवत मातोश्री मुक्ताई धोंडगे या माऊलीच्या सुचनेवरुन केले.आजही आपण पाहतो मन्याड खोर्‍यातला तरुण महाराष्ट्रभर कार्यालयात निर्भीडपणे नेतृत्व गुणावर अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत आपली सेवा पुर्ण करतो. हा लेख वाचून झाल्यावर साप्ताहिक जयक्रांतिचा अग्रलेख ” पचल ते खावं,शोभेल ते ल्यावं,स्वर असेलर गावं,पण व्यर्थ वाया जावू नये..!”हा वाचनीय असा “अग्रलेख ” सा.जयक्रांतीचे खंदे शिलेदार एस.के गायकवाड यांच्या लिखाण कौशल्याच्या सहकार्य समर्थ हस्ते लिहून सा.जयक्रांति प्रकाशित होणार आहे.त्यांच्या लेखनीत आजही तोच रुबाब…तीच धार….मराठीच्या कुठल्या कोषात नसलेला शब्द आजही नवनिर्मितीच्या सृजनशील वृतीने सहज उपयोगात आणतात.त्यांनी अनेक राजकारणी,लेखक, कवी,साहित्यिक, सुत्रसंचलक सहित अनेकांच्या गुणांना पैलू पाडत त्यांना एखाद्या शिल्पकार सम आकार देवून घडविले आहे.त्यांच्या अवलिया जीवन प्रवासाला अन् शब्दप्रभु व्यक्तीमत्वास, संसदीय असो का विधानसभेतील कामकाज असो! त्यांच्या कार्याला तोडच नाही.त्यांनी हजारो सत्याग्रह व मोर्चे काढले. पण त्यांची नावे अफलातूनच होती.शासकीय अधिकाऱ्यांना घाम फोडणारी कार्य शैली!कंधार तालूक्याला चळवळीचा तालूका म्हणून नावलौकिक मिळवून देणारे मुक्ताईसुत हे एकमेव लोहा-कंधार तालूक्यात अनेक महापुरुषांच्या स्मारकांचे ते निर्माणकर्ते आहेत.

निजामाच्या निजामशाहीची झळ सोसलेल्या तालूक्यात नव्हे विभागात छ.शिवरायांचे नाव शैक्षणिक संस्था श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार नावे काढून छ. शिवरायांचे नाव निर्भीडपणे घेण्यास जनतेस शिवरायांच्या इतिहासाची ओळख करून दिली.त्यांच्या तरुणाईस लाजवणार्‍या जिद्दीस लाल सलाम व मानाची कोटी-कोटी जयक्रांति!

गोपाळसुत 

दत्तात्रय एमेकर गुरुजी,

क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *