अहमदपूर : प्रा भगवान अमलापुरे
.
येथील महात्मा गांधी महाविद्यालया समोरच्या महात्मा गांधी नगरमध्ये हुतात्मा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपीता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या ७४ व्या पुन्यतिथी निमित्ताने अनिसचे डॉ धीरज देशमुख यांच्या हस्ते महात्म्याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साधना प्रकाशन पुणे यांनी महात्म्यावर प्रकाशित केलेल्या ग्रंथाचे पुजन एल आय सी चे विकास अधिकारी मोहीब कादरी,बुरसपट्टे गुरुजी आणि नगरसेवक अभय मीरकले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक भागवतराव येणगे यांनी महात्मा गांधीनी सांगितलेले ०७ सामाजिक पातके सांगितले. त्याचे पालन वैयक्तिक पातळीवर केले तर प्रत्येक जण, समाज, देश आणि जग सुद्धा सुखी समाधानी आणि आनंदी होईल. असेही त्यांनी सांगितले.
भागवतराव येणगे यांनी या प्रसंगी सर्वच उपस्थितांना, ” एक धैर्यशील योद्धा – गांधी, महात्मा गांधी यांचे विचारधन ” ,संकल्पना : संजय रेंदाळकर, संकलन : संजय मुनोत, मेघा सुतार हे पुस्तक भेट दिले.
कार्यक्रमास इंजिनिअर मोसीनसाहेब, गुट्टे सर, पत्रकार प्रा रत्नाकर नळेगावकर,पत्रकार चंद्रशेखर भालेराव, एन डी राठोड, विशाल बेंबडे आणि प्रा भगवान आमलापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ धीरज देशमुख, गांधी अभ्यासक भागवतराव येणगे, एल आय सी चे विकास अधिकारी मोहीब कादरी, बुरसपट्टे गुरुजी, नगरसेवक अभय मीरकले, इंजिनिअर मोसीनसाहेब, गुट्टे सर, पत्रकार प्रा रत्नाकर नळेगावकर, पत्रकार चंद्रशेखर भालेराव,एन डी राठोड, विशाल बेंबडे आणि प्रा भगवान आमलापुरे दिसत आहेत.