कंधार
एमेकर परिवार क्रांतिभुवन बहाद्दरपुरा या परिवारातली पहिली एम.बी.बी.एस शिक्षणासाठी जाण्याचा मान कु वैष्णवी दमयंती अनिल एमेकर हिने मिळवला आहे.
नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय वडील अनिल एमेकर सेवा करत असतांना मागच्या एप्रिल महिन्यात फक्त दहा दिवसात माता दमयंती एमेकर अन् पिता अनिल रुक्माजीराव एमेकर या दोघांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
आई-वडीलांचे फक्त दहा दिवसात निधन झाल्या नंतर नीट परीक्षा दिली होती . नुकताच तिचा निकाल आला असून पहील्याच यादीत तिचे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे एम.बी.बी.एस.वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी ती पात्र झाली आहे.
गत वर्षी एप्रिल महिन्यात दोघांचेही छत्र हिरावल्या नंतर मुलीने न डगमगता आलेल्या संकटास तोंड देत आपल्या मनाला सावरत तीने हे यश मिळवत शासकिय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे प्रवेश पात्र होवून नाव कमविले. ही बाब अनेक विद्यार्थ्यांस प्रेरणादायी नक्कीच आहे.
कोरोना ने आई-वडीलास हिरावले..पण कु वैष्णवीने त्यांचे नाव कमावले असे
सर्व स्तरातून कु.वैष्णवी दमयंती अनिल एमेकर हीच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होत आहे.तिचे मोठे दोन बंधु आकाश आणि आमोल यांना तर बहिणीच्या यशाने आकाश ठेंगणे झाले आहे.
दत्तात्रय एमेकर व एमेकर परिवार रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार यांच्या वतीने मनस्वी अभिनंदन करून सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार च्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत.