कंधार
आज कंधार चे तहसीलदार आदरणीय संतोष कामठेकर यांना प्रहार दिव्यांग संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष कंधार च्या वतीने संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना श्रावण बाळ निराधार योजना ची तात्काळ मीटिंग लावून संपूर्ण अर्ज निकाली काढण्यासाठी निवेदन देण्यात आले .या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले.
आहे की 28 फेब्रुवारी पर्यंत दिव्यांग बांधव विधवा महिला व वयोवृद्ध यांची सर्व अर्ज निकाली काढून मानधन मंजूर करावे. अन्यथा तहसील कार्यालय कंधार समोर अमरण उपोषण व आंदोलन करण्यात येईल. तहसीलदार साहेबांनी तात्काळ मीटिंग घेऊन सर्व अर्ज निकाली काढण्याचे संगायो विभागाचे मोरे यांना कळविले आहे.
हे निवेदन देण्यासाठी प्रहार दिव्यांग महिला तालुकाध्यक्ष संगीता धोंडाप्पा वाकडकर नवनाथ भाऊ वाखरडकर लखन वाघमारे इत्यादी उपस्थित होते.