शेकापूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

कंधार प्रतिनिधी /उमर शेख

     कंधार तालुक्यातील मौजे शेकापुर येथे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञान योग्य सोहळ्याचे आयोजन निलेवाड शेती फार्म येथे करण्यात आले आहे अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 29/ 1/ 2022 रोज शनिवार पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात होत असून सांगता दि.5/2 /2022 शनिवारी होत आहे. या हरिनाम सप्ताह मध्ये गायनाचार्य निळकंठ महाराज तोटवाड (कल्हाळी) नागोराव महाराज मरशिवणे( कुरूळा) कुमार महाराज शिंदे ( लातूर) मृदंगवादक श्री सुरेश महाराज वचेवाड (अगंनबीड) अमोल महाराज लाकडे,काकडा प्रमुख गोपाळ मोरताडे,बळीराम बंडेवाड, संभाजी कुराडे धोंडीबा जेलेवाड, भजनी मंडळ शेकापुर, तळ्याचीवाडी ,संगमवाडी, बिजेवाडी, गगनबीड, बाभूळगाव, बाबुळगाव, डोंगरगाव ,आडगा पेठवडज व चोपदार निवृत्ती इटकापले व भागवताचार्य श्री ह.भ.प. नामदेव महाराज पेठवडजकर, संगीतसाथ संगीत विशारद ह भ प कुमार उर्फ विशाल महाराज शिंदे खरोळकर लातूर तबला साथ ह.भ.प अमोल महाराज लाकडे नांदेड या हरिनाम सप्ताह लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा  व हा सोहळा निलेवाड शेती फार्म हाऊस येथे पार पडत आहे अशी नम्र विनंती संयोजक श्री ह भ प मोतीराम बाबाराव निलेवाड व श्री अँड. दत्तात्रेय माणिकराव निलेवाड , सरपंच भुस्कुटे ,उपसरपंच मोरे, माजी उपसभापती संभाजी पाटील केंद्रे, डफडे पाटील, कदम ,गायकवाड ,श्रीमंगले आणि समस्त निलेवाड परिवार, समस्त गावकरी मंडळी शेकापुर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *