हृदयी वसंत फुलताना ……!वसंतपंचमी : वसंतोत्सव

५ फेब्रुवारी : शनिवार

सध्या सर्वत्र इंग्रजी महिन्यांचा वापर सुरू आहे, त्यामुळे मराठी ऋतू, मराठी महिने,मराठी सण, मराठी पंचांग, मराठमोळ्या साहित्यातील लोकप्रिय गीते,नवीन पिढीतील अनेक जणांना माहिती नाहीत,त्याचे विस्मरण होते की का? याची मनात शंका निर्माण झाली आहे, या दिवशी सृष्टीतील नवचैतन्य आणि नवनिर्माण यांच्यामुळे झालेला आनंद प्रकट करणे आणि मौज करणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे,


वसंतपंचमी हा उत्सव सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आहे.नवीन विद्या प्राप्ती, गृहप्रवेश,पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करणे त्यामुळे वसंत पंचमीचे अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय महत्त्व या लेखात सांगितले आहे,
त्यामुळेच हा लेखन प्रपंच…….


शनिवारी वसंतपंचमीचा उत्सव आहे,

मराठी पंचांगानुसार वसंत ऋतुला ‘ऋतूंचा राजा ‘म्हणतात, या ऋतूत मनाला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी घडताना दिसतात व वसंत ऋतूमध्ये मनात चांगली भावना निर्माण होते, वनस्पतीला नवी पालवी फुटते हा हंगाम मनाला भुरळ घालतो,
फुलांना बहरण्यासाठी चांगला मोसम आहे,मधमाशा मध गोळा करताना दिसतात,फुलपाखरे फुलांच्या भोवती पिंगा घालून मधुर रस शोषून घेतात,
कोकिळा गर्द झाडीमध्ये फांदीवर बसून गात असते, ऐकणा-यांच्या मनात आनंद व चैतन्य निर्माण होते. त्यामुळेच तर हृदयी वसंत फुलतो, मनाला आनंद देणारा सुगंध दरवळतो,


याच काळात शेतीत गहू, हरभरा करडई ही सर्व पिके येतात,झाडांना नवी पालवी फुटते,आंब्यांना मोहोर येतो,पळस जणू काही धरतीवर रंगाची उधळण करीत असतो.या काळात नैसर्गिक वातावरण ही स्वच्छ व सुंदर आणि आल्हाददायक असते.
वसंत ऋतु खूप आनंददायी असून
तो भारतातील सर्वात लोकप्रिय ऋतु आहे.
आकाशातील पक्षी सुद्धा वसंत ऋतूचे आनंदाने स्वागत करताना दिसतात.
“कविता करण्यासाठी कवीना हा ऋतु महत्त्वाचा वाटतो, म्हणूनच’ ह्दयी वसंत फुलताना। प्रेमास रंग यावे।। त्या साठीच असे म्हटले जाते,
वसंत ऋतु हा सर्वांना सुखाचा संदेश देताना दिसतो, वसंत ऋतूत वसंत पंचमी, होळी, गुढीपाडवा, रामनवमी,हनुमान जयंती असे अनेक सण येतात,भारतात एकूण सहा ऋतू आहेत,वसंत ,ग्रीष्म,वर्षा,शरद, हेमंत,
शिशिर अशी त्याची नावे आहेत, प्रेमभावनेचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो ,लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात, तसेच या दिवशी’ राधाकृष्ण’ आणि मदन व रती यांच्या प्रेमाचे गीते गातात, वसंत पंचमीला विठ्ठल रुक्मिणीचा विवाह पंढरपूर येथे झाला आहे,शीख समाजात गुरुद्वारामध्ये सामाजिक उत्सव म्हणून वसंतपंचमीचे आयोजन करण्याची पद्धत आहे, महाराजा रणजीतसिंह यांनी अमृतसर येथील हरमंदिर साहिब गुरुद्वारामध्ये या उत्सवाची सुरूवात केली, याच मंदिरात वसंत पंचमी या दिवशी ‘वसंत राग’ सुरू केला जातो, आणि १३ एप्रिल रोजी त्याची सांगता होते, शीखांचे दहावे गुरू गुरूगोविंद सिंह यांनी ‘खालसा पंथाची ‘स्थापना वसंत पंचमीच्या दिवशीच सुरू केली, म्हणूनच वसंतपंचमी हा सण शीखधर्मात अतिशय महत्त्वाचा उत्सव मानला जातो,


बाराव्या शतकात भारतीय सुफी मुस्लिम व्यक्तीं हिंदूच्या वसंतोत्सवाचा स्वीकार करून फार मोठा प्रमाणात हा सण साजरा केला जात असे,
दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यात वसंतपंचमीच्या दिवशी शाही स्नान केले जाते या सणाला अतिशय आध्यात्मिक महत्त्व आहे,पेशवेकालीन काळात सुद्धा या सणाला विशेष महत्त्व दिलेले होते,


वसंतऋतुचे सौंदर्य आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला कलात्मक बनवितो,आत्मविश्वासाने नवीन काहीतरी कार्य मनुष्य करीत असतो, रात्री शीतल आकाश आणि मग चंद्रप्रकाश दोन्ही गोष्टी खूप आनंददायी असतात, म्हणूनच वसंत ऋतू हा प्रभावी आणि आल्हाददायक ऋतू मानला जातो,आकाशातील पक्षीसुद्धा वसंत ऋतुला प्रेमाने अभिवादन करतात,वसंत ऋतू फेब्रुवारीपासूनच सुरू होतो, पानगळ सरून गेल्यानंतर कोळ्या पानांनी भरून जाणारा ऋतू लाल,केसरी फुलणारा गुलमोहर तर उन्हाच्या झळा सोसून छान डौलाने उभा राहतो, आयुर्वेदाने कालमानाचा,ऋतूमानाचा विचार करून सहा ऋतू सांगितलेले आहेत,अशा या वसंतपंचमीचा ‘आनंदोत्सव’ देशात आणि परदेशात ही साजरा केला जातो ,या दिवशी सरस्वतीचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो ,मथुरा,वृंदावन, राजस्थान या ठिकाणी विशेष उत्सव म्हणून साजरा करतात, वसंत पंचमी ही शिशिरमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय,या ‘पंचमीला ‘ज्ञानपंचमी’असेही म्हणतात, हा उत्सव रेवती नक्षत्रात साजरा केला जातो ,शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही या दिनाचे विशेष महत्त्व आहे,पूर्वीच्या काळी सरस्वती पूजेच्या दिवशी मुली पहिल्यांदा साडी नेसत असत अशी माहिती मिळाली आहे, विद्येची देवता सरस्वतीची पूजा याच दिवशी केली जाते,वसंताचा उत्सव आशावादाचे प्रतीक आहे, वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाप आहे, कल्पना व वास्तव यांचा सुगम समन्वय आहे, महर्षी वाल्मिकांनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे,
भगवान श्रीकृष्णांनी ही गीतेत वसंतऋतुला ‘ कुसुमाकर’ असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरूदावली गायली आहे,हा उत्सव संक्रमण स्थितीचा द्योतक आहे,पौराणिक कथांनुसार वसंत पंचमीच्या अनेक कथा सांगता येतात, अध्यात्मामध्ये वसंत पंचमीला अतिशय महत्त्व आहे, तसेच तरुणांना वसंतऋतु अतिशय आवडताना दिसतो त्यासाठी चांगल्या रूढी, परंपरा पाळून,मराठी अस्मिता जोपासली पाहिजे,पश्चिम बंगालमध्ये अजूनही वसंत पंचमीला प्रेमाच्या उत्सवाचं स्वरूप आहे या दिवशी मुले- मुलींना प्रपोज करतात.


या निमित्ताने संस्कृतीचे जतन करूनच आपले सण, रूढी ,परंपरा यांचे सकारात्मक महत्त्व लक्षात घेऊन साजरे करावेत व त्यातून आनंद घेऊन हृदयी वसंत फुलताना। प्रेमांस रंग यावे।। प्रेमांत रंग भरताना।दुनियेस…..
वसंतपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

       साहित्यिक

प्रा, विठ्ठल गणपत बरसमवाड
खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *