पांगरा येथे सर्वधर्मिय अखंड शिवनाम ज्ञानयज्ञ, शिवकथा सोहळ्याचा दि.१० फेब्रुवारी रोजी बाबुराव महाराज करंजीकर यांच्या किर्तनाने होणार सांगता

कंधार ; ता. प्र.

राष्ट्रसंत वसुंधरारत्न श्री डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर त्यांचे कृपा आशिर्वादाने, श्री प.प्र. १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठसंस्थान मुखेड यांच्या प्रेरणेन कंधार तालुक्यातील पांगरा येथे दि.४ फेब्रुवारी ते दि. १० फेब्रुवारी २०२२ या कालावधीत शिवकथेचे आयोजन करण्यात आले असून बाबुराव महाराज करंजीकर यांच्या किर्तनाने सांगता होणार आहे.

दरम्यान शिवदिक्षा कार्यक्रम दि. ५ फेब्रूवारी २०२२ रोजी श्री प.ग्र.१०८ डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे हस्ते शिवदिक्षा सोहळा संपन्न झाला . यावेळी शिवभक्त राजेश्वर पाटील पांगरेकर यांनी महाराजांचे पुजन करून आशीर्वाद घेतला.

कार्यक्रमा दरम्यान दररोज शिवपाठ सकाळी ५ ते ६ व सायंकाळी ५ ते ६ या वेळेत होत आहे.या कार्यक्रमासाठी अन्नदाते महणून गोविंद स्वामी ,सुभाष कौशल्ये , रामदयाळ ठाकूर , गंगाधर बेद्रे , उमाकांत कोंडे ,
माधव भेरे , बालाजी पांडुरंग लालगे सहकार्य करत आहेत . शि.भ.प.बाबुराव महाराज करंजीकर कथाकार यांचे दररोज कथा होत असून कार्यक्रमाचा समारोप
किर्तनाने होणार आहे.

सदरील कार्यक्रमामधे कोरोना नियमांचे पालन करण्यात येत आहे. तरी भाविकांनी सहकार्य करावे. अशी विनंती समस्त मौ. पांगरा गावकरी व गावातील गोविंदराव पाटील , माधवराव टेकाळे , नारायण रूंजे ,विजय लालमे , कल्यान बेंद्रे , बळी भेरे ,केरबा गजेवाड , उमाकांत स्वामी , सुंदर सिंग ठाकुर , विश्वनाथ आवलवार ,विश्वनाथ कोंडे , आदीनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *